मुंबई, 20 एप्रिल : राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमान प्रचंड वाढले आहे. उन्हाचा पारा चढल्याने अनेकांना घराबाहेर पडणेही मुश्किल झाले आहे. अशातच शालेय मुलांना सुट्या कधी लागणार असा प्रश्न निर्माण झाला असताना राज्य शिक्षण मंडळानी सुट्यांची तारीख जाहीर केली आहे. याबातचे शासन परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
शाळांना कधीपासून लागणार सुट्या –
राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना गुरुवार, 2 मे पासून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच विदर्भातील जिल्हे वगळता शनिवार, दि. १५ जून रोजी राज्य मंडळाच्या सर्व विभागातील शाळा भरविण्यात येणार आहेत. प्राथमिक आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी उन्हाळी सुट्ट्यांबाबत माहिती देण्यासाठी काल 18 एप्रिल रोजी संयुक्त परिपत्रक जारी केले.
विदर्भातील जून महिन्यातील तापमान विचारात घेता, उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर तेथील राज्य मंडळाच्या शाळा 1 जुलैपासून सुरू कराव्यात, असे परिपत्रकात नमूद केले आहे. राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरु असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शेक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास, विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घेण्याबाबत कळवले आहे.
हेही वाचा : खान्देशात उन्हाचा वाढतोय पारा! जाणून घ्या, पुढील दोन दिवसाचे तापमान अन् ‘अशी’ घ्या स्वतःची काळजी