• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

शिक्षक पात्रता परीक्षेचा (TET) पेपर फुटला; उद्या होणारी परीक्षा रद्द, भिंवडीतील पोलिसांच्या धाडीतून मोठी माहिती समोर

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 27, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
शिक्षक पात्रता परीक्षेचा (TET) पेपर फुटला; उद्या होणारी परीक्षा रद्द, भिंवडीतील पोलिसांच्या धाडीतून मोठी माहिती समोर

ठाणे, 27 जून: राज्यात उद्या रविवारी (28 जून) होणारी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) ऐनवेळी पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षा सुरू होण्याच्या एक दिवस आधीच प्रश्नपत्रिका फुटल्याची माहिती समोर आल्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने हा निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वी नीट (NEET) परीक्षेतील पेपरफुटीच्या घटनेनंतर देशभरात खळबळ उडाली होती. त्यानंतर आता टीईटी परीक्षेतील कथित पेपरफुटीमुळे राज्यातही मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.

भिंवडीतील पोलिसांच्या धाडीतून मोठी माहिती समोर –

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत राज्यातील 37 शहरांतील 1,028 परीक्षा केंद्रांवर टीईटी परीक्षा घेण्यात येणार होती. नीट परीक्षेतील गैरप्रकार लक्षात घेऊन यावेळी सुरक्षेच्या विशेष उपाययोजना करण्यात आल्या होत्या. मात्र, शनिवारी पहाटे गोपनीय माहितीच्या आधारे भिवंडी पोलिसांनी एका ठिकाणी छापा टाकला. तेथे काही व्यक्तींकडे टीईटीच्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित माहिती असल्याचा संशय आला.

परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केल्यानंतर त्यांच्या ताब्यातील काही प्रश्न हे मूळ प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांशी जुळत असल्याचे आढळले. त्यानंतर संबंधितांविरुद्ध भिवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेची गांभीर्याने दखल घेत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 28 जूनची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला.

उद्या होणारी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय –

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) ही इयत्ता पहिली ते आठवीच्या शिक्षक पदांसाठी उमेदवारांची पात्रता निश्चित करण्याकरिता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यावतीने आयोजित केली जाणारी एक राज्यस्तरीय परीक्षा आहे. दरम्यान, ही परीक्षा पूर्णपणे पारदर्शक आणि निष्पक्ष वातावरणात होणे आवश्यक असल्याने तसेच संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे परिषदेने स्पष्ट केले आहे. परीक्षेबाबतची पुढील सर्व माहिती अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार असल्याचेही सांगण्यात आले.

परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर होणार –

परीक्षा परिषदेच्या उपायुक्त प्रिया शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, परीक्षेची नवीन तारीख येत्या दोन ते तीन दिवसांत जाहीर केली जाईल. राज्यातील सुमारे 6 लाख 126 परीक्षार्थींना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. तसेच कोणतेही अतिरिक्त परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. नव्या तारखेनुसार राज्यातील सर्व 1,028 परीक्षा केंद्रांवर टीईटी परीक्षा पुन्हा आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

हेही वाचा: MPSC उमेदवारांसाठी मोठी बातमी! आता सर्व पूर्व परीक्षा CBT पद्धतीने अन् निकाल फक्त 21 दिवसांत

बातमी शेअर करा !
Share
Tags: marathi newssuvarna khandesh liveteacher eligibility testtet exam scheduled for tomorrow cancelledtet paper leaked

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिक्षक पात्रता परीक्षेचा (TET) पेपर फुटला; उद्या होणारी परीक्षा रद्द, भिंवडीतील पोलिसांच्या धाडीतून मोठी माहिती समोर

शिक्षक पात्रता परीक्षेचा (TET) पेपर फुटला; उद्या होणारी परीक्षा रद्द, भिंवडीतील पोलिसांच्या धाडीतून मोठी माहिती समोर

June 27, 2026
बनावट केळी लागवड दाखवून पीक विमा; दोषींवर कारवाई करणार – मंत्री दत्तात्रय भरणे

बनावट केळी लागवड दाखवून पीक विमा; दोषींवर कारवाई करणार – मंत्री दत्तात्रय भरणे

June 27, 2026
नाथसागरचे पाणी उत्तर महाराष्ट्रात आणण्याची मागणी; जळगाव जिल्हा जलसंपन्न करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन

नाथसागरचे पाणी उत्तर महाराष्ट्रात आणण्याची मागणी; जळगाव जिल्हा जलसंपन्न करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन

June 27, 2026
‘राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण’ मोहिमेत सर्व पालकांनी सहभागी व्हावे; आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे आवाहन

‘राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण’ मोहिमेत सर्व पालकांनी सहभागी व्हावे; आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे आवाहन

June 27, 2026
MPSC उमेदवारांसाठी मोठी बातमी! आता सर्व पूर्व परीक्षा CBT पद्धतीने अन् निकाल फक्त 21 दिवसांत

MPSC उमेदवारांसाठी मोठी बातमी! आता सर्व पूर्व परीक्षा CBT पद्धतीने अन् निकाल फक्त 21 दिवसांत

June 27, 2026
अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर कारवाई; मालवाहू वाहनांचे परवाने रद्द होणार – मंत्री प्रताप सरनाईक

अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर कारवाई; मालवाहू वाहनांचे परवाने रद्द होणार – मंत्री प्रताप सरनाईक

June 26, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page