सुनिल माळी, प्रतिनिधी
पारोळा, 25 फेब्रुवारी : पारोळा येथील टायगर इंटरनॅशनल स्कूलमध्ये जागतिक मातृभाषा दिवसाच्या निमित्ताने सिनियर केजीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मराठी मातृभाषा दिनानिमित्त दीप्ती पाठक या शिक्षिकेने स्वखर्चाने प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करत विजेत्यांना बक्षीस वितरणही केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर व मातृभाषेवर आधारित असलेल्या 50 प्रश्नांचे समावेश केला होता. दररोज पाच प्रश्न व्हाट्सअपचे साह्याने विचारून त्यांचे व्हिडिओ तयार केले गेले व व्हिडिओ व्हाट्सअप ग्रुपला रोज पाठवण्यात आले. अशा पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांना ते व्हिडिओ पाहायला मिळाले.
त्यानंतर दीप्ती पाठक यांनी स्पर्धेचे आयोजन केले आणि स्वखर्चाने बक्षीस वितरण केले. शिक्षिकेचे विद्यार्थीप्रती असलेले दातृत्व पाहून स्कूलचे अध्यक्ष रवींद्र पाटील संचालक रूपाली पाटील, प्राचार्य अजीम शेख व उपप्राचार्य कविता सूर्यवंशी यांनी त्यांचे आभार मानले.
हेही : पारोळा तालुक्यातील करंजी गावाजवळ भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू तर 2 जखमी