इसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 2 सप्टेंबर : जालन्यात मराठा आंदोलकांवर काल लाठीचार्ज करण्यात आला. त्यामुळे राज्यभरात आज ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आली. दरम्यान, पाचोऱ्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशींच्या नेतृत्वात लाठीचार्जच्या घटनेच्या निषेधार्थ मोर्चा काढत प्रशासनाला निवदेन दिले.
पाचोऱ्यात ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यलयापासून ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. तसेच लाठीचार्जच्या निषेधार्थ तहसिलदार प्रविण चव्हाणके यांना निवदेन देण्यात आले.
लाठीचार्जची घटना ही खूप निंदनीय आहे. महाराष्ट्र हे महिलांचा आदर करणारे राज्य आहे. परंतु सध्याचे असंवेदनशील, निगरगठ्ठ सरकार आहे. सदर पोलीस प्रशासनाने केलेल्या अमानुष लाठीचार्जची चौकशी होऊन संबंधितावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही व्हावी, असे न झाल्यास उबाठा शिवसेना पाचोरा रस्त्यावर उतरेल व त्यांच्या होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी, अशा आशयाचे निवेदन तहसिलदारांना देण्यात आले.
यावेळी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपक सिंग राजपूत, उपजिल्हाप्रमुख उद्धव मराठे व शेतकरी सेना जिल्हाप्रमुख अरुण पाटील, रमेश बाफना, तालुकाप्रमुख शरद पाटील, शहरप्रमुख अनिल सावंत, शहरप्रमुख दीपक पाटील, शहर संघटक राजेंद्र राणा, शहर संघटक दत्ताभाऊ जडे, शहर संघटक दादा चौधरी, शहरप्रमुख भरत खंडेलवाल, युवासेना तालुकाप्रमुख शशिकांत पाटील, युवा सेना शहर प्रमुख मनोज चौधरी, उप जिल्हा संघटिका तिलोंत्तामा मौर्य, संभाजी ब्रिगडचे जिल्हाध्यक्ष प्रवीण पाटील, राजेंद्र भोसले, एडवोकेट अभय पाटील, मंदाकिनी पारोचे, कुंदन पंड्या, जयश्री येवले, अनिता पाटील महिला आघाडी, जिभाऊ पाटील, आदी कार्यकर्त्यांसह मराठा बांधव उपस्थित होते.