ईसा तडवी, प्रतिनिधी
सावखेडा (पाचोरा), 1 फेब्रुवारी : पाचोरा तालुक्यातील सावखेडा येथील भैरवनाथ मंदिरातील गाभाऱ्याचे दरवाजाचे कुलूप तोडून मंदिरातील तिजोरीत अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची मोठी बातमी समोर आली आहे. दिनांक 1 फेब्रुवारी रोजी पहाटे 03.15 ते 5.00 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पिपंळगाव हरेश्वर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे संपूर्ण बातमी? –
पाचोरा तालुक्यातील सावखेडा येथील भैरवनाथ मंदिरातील गाभाऱ्याचे दरवाजाचे कुलूप तोडून गाभाऱ्यातील तिन्ही मूर्तीवरील चांदी मिश्रित धातूच्या 64000 रुपये किमतीच्या 2 किलो 250 ग्रॅम वजनाच्या तीन छत्र्या तसेच मंदिरातील 4 दानपेटीतील 5500 रुपये रोख अंदाजे, असे एकूण 69,500 रूपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला.
मंदिराचे पुजारी रामचंद्र परदेशी यांना सकाळी 5 वाजेच्या सुमारास मंदिरात चोरी झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी मंदिर संस्थानचे सदस्य यांना फोनद्वारे कळवली. दरम्यान, मंदिर संस्थानचे सदस्य प्रकाश नारायण परदेशी (रा. सावखेडा खु.) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सपोनी प्रकाश काळे यांच्या मार्गदर्शनाने सहायक पोलीस उपनिरिक्षक विजय माळी हे करीत आहेत.
हेही वाचा : Nashik Crime : पत्नीची नवऱ्याच्या संपत्तीवर नजर, हत्येचा कट रचत केले धक्कादायक कृत्य