मुंबई, 19 सप्टेंबर : राज्यातील महायुती सरकारची लोकप्रिय ठरत असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा तिसरा हप्ता आणि या योजनेसाठी नव्याने नोंदणी केलेल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात कधी पैसे येणार याबाबत सर्व महिलांना उत्सुकता लागली आहे. असे असताना राज्यातील लाडक्या बहिणींना आज पुन्हा एकदा गोड बातमी मिळणार आहे.
तिसरा हफ्ता बहिणींच्या खात्यात जमा होणार –
राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची घोषणा करण्यात आली होती. यानंतर मोठ्या प्रमाणात महिलांनी या योजनेसाठी नोंदणी प्रक्रिया केली आहे. दरम्यान, लाडकी बहिण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता एकत्रित पणे रक्षाबंधनानिमित्त पात्र महिलांच्या खात्यात वितरित केला होता. दरम्यान, आज तिसरा हफ्ता बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे.
‘या’ महिलांच्या खात्यात जमा होणार तीन हप्ते? –
लाडकी बहिण योजनेचे दोन हप्ते वितरित करण्यात आल्यानंतर आता तिस-या हफत्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. यानुसार, 19 सप्टेंबर म्हणजे आज सायंकाळी 4 वाजल्यापासून पात्र महिलांच्या खात्यात तिसरा हफ्ता जमा होण्यास सुरुवात होईल. दरम्यान, ॲागस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात ज्या बहिणींनी अर्ज केला आहे त्यांना एकत्रितपणे 3 महिन्यांचे 4 हजार 500 रुपये मिळण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना –
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुन महिन्यात लाडकी बहिणी योजनेची घोषणा केली. यानंतर 1 जुलै पासून महिलांचे अर्ज स्विकारण्यास सुरु करण्यात आले. रक्षाबंधनानिमित्त 14 ॲागस्ट या दिवशी राज्यातील पात्र महिलांच्या खात्यात जुलै आणि ॲागस्ट या दोन महिन्यांचे हफ्ते प्रत्येक दीड हजार यानुसार 3 हजार रुपये जमा झाले. दरम्यान, या दोन हप्त्यांच्या माध्यमातून जवळपास 1 कोटी महिलांना या पहिल्या दोन हफत्यांचा लाभ मिळाला आहे. दरम्यान, लाडकी बहिण योजनेचा तिसरा हप्ता खात्यात जमा होणार आहे.
हेही पाहा : Yogendra Puranik Interview : जपानमधील मराठमोळे आमदार योगेंद्र पुराणिक यांची विशेष मुलाखत