• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

सनदी अधिकारी तुकाराम मुंढे, अश्विनी भिडे यांच्यासह राज्यातील 10 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 1, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
सनदी अधिकारी तुकाराम मुंढे, अश्विनी भिडे यांच्यासह राज्यातील 10 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई, 1 एप्रिल: महायुती सरकारच्या काळात प्रशासनात मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्यात आले असून राज्यातील 10 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव अश्विनी भिडे यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कडक व धडाडीचे अधिकारी म्हणून ओळख असलेले तुकाराम मुंढे यांची दिव्यांग कल्याण विभागातून राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन व मदत कार्य विभागात बदली करण्यात आली आहे.

आश्विनी भिडे यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती –

मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव अश्विनी भिडे यांची मुंबई महानगर पालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. यानंतर त्यांनी कालच मावळते आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून पदभार स्वीकारला. दरम्यान, अश्विनी भिडे ह्या मुंबई महापालिकेच्या इतिहासातील पहिल्या महिला आयुक्त ठरल्या आहेत.अश्विनी भिडे या 1995 बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. या आधी त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं असून मेट्रो वूमन म्हणूनही त्यांची ओळख आहे.

सनदी अधिकारी तुकाराम मुंढेंची बदली –

सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी दिव्यांग कल्याण विभागात कार्यरत असताना बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या प्रकरणांवर कठोर कारवाई केली होती. या मोहिमेत अनेक जिल्ह्यांतील जिल्हा परिषदांमधील शेकडो कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. ही कारवाई सुरू असतानाच त्यांच्या बदल्याचा निर्णय घेण्यात आला असून आता राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन व मदत कार्य विभागात बदली करण्यात आली आहे.

राज्यातील ‘या’ अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या –

  1. लोकेश चंद्र यांची महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदावरून मुख्यमंत्री यांच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी, मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
  2. अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्री यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदावरून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  3. विकास चंद्र रस्तोगी यांची कृषी विभागातील अतिरिक्त मुख्य सचिव पदावरून वित्त विभागातील अतिरिक्त मुख्य सचिव (वित्तीय सुधारणा), मंत्रालय, मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
  4. विनिता वैद्य सिंघल यांची आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन व मदत कार्य विभागाच्या प्रधान सचिव पदावरून मृद व जलसंधारण विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  5. परिमल सिंह यांची नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (POCRA) येथील प्रकल्प संचालक पदावरून कृषी विभागातील सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  6. तुकाराम मुंढे यांची दिव्यांग कल्याण विभागातील सचिव पदावरून आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन व मदत कार्य विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  7. लहू माळी यांची शिवशाही पुनर्वसन प्रकल्प लि., मुंबई येथे व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  8. माणिक गुरसळ यांची दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई येथे सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  9. प्रेरणा देशभ्रतार यांची राज्य कर विभागातील सहआयुक्त पदावरून मत्स्यव्यवसाय विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  10. पृथ्वीराज बी. पी. यांची पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावरून वसई-विरार महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा: आमदार किशोर आप्पा पाटील आणि माजी खासदार उन्मेश पाटील यांच्यावर शिवसेनेकडून पक्षसंघटनेसाठी मोठी जबाबदारी

बातमी शेअर करा !
Share
Tags: ias ashwini bhideias transfersias tukaram mundhemahayuti governmentmarathi newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतीच्या उत्पादन वाढीसाठी डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतीच्या उत्पादन वाढीसाठी डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 23, 2026
चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी आरोग्य जनजागृती शिबिर; डेंग्यू, हिवतापासह जलजन्य आजार, कुष्ठरोग व एचआयव्ही-एड्सबाबत मार्गदर्शन

चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी आरोग्य जनजागृती शिबिर; डेंग्यू, हिवतापासह जलजन्य आजार, कुष्ठरोग व एचआयव्ही-एड्सबाबत मार्गदर्शन

August 22, 2026
तारखेडा रेल्वे गेट व शेतकरी रस्ता बंद; खासदार स्मिता वाघ यांची पाहणी, पर्यायी व्यवस्था करण्याच्या रेल्वे प्रशासनाला सूचना

तारखेडा रेल्वे गेट व शेतकरी रस्ता बंद; खासदार स्मिता वाघ यांची पाहणी, पर्यायी व्यवस्था करण्याच्या रेल्वे प्रशासनाला सूचना

August 22, 2026
व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

August 22, 2026
‘ग्रामसभा कमी नको, अधिक सक्षम करा;’ ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या मागणीला हरकत

‘ग्रामसभा कमी नको, अधिक सक्षम करा;’ ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या मागणीला हरकत

August 22, 2026
पेलेट गन हल्ला प्रकरण; राहुल गांधींचे दिल्लीत आंदोलन अन् अखेर दिल्ली पोलिसांकडून एफआयआर दाखल करण्याची तयारी

पेलेट गन हल्ला प्रकरण; राहुल गांधींचे दिल्लीत आंदोलन अन् अखेर दिल्ली पोलिसांकडून एफआयआर दाखल करण्याची तयारी

August 21, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page