• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

आदिवासी विकास विभागाचे ‘सेवा संकल्प अभियान’ यशस्वीपणे राबवावे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत १७ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर २०२६ दरम्यान विशेष उपक्रम

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 11, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
आदिवासी विकास विभागाचे ‘सेवा संकल्प अभियान’ यशस्वीपणे राबवावे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

मुंबई, 9 सप्टेंबर: आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात यावे, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिले. या अभियानाच्या माध्यमातून योजनेचा लाभार्थी संवाद, योजना प्रसिद्धी, वनहक्क, महिला बचत गट, आरोग्य तसेच आश्रमशाळा व वसतिगृहांतील मूलभूत सुविधां, आरोग्य सेवा, यासर्व सेवा सुविधांवर विशेष लक्ष केंद्रित करावे, असे त्यांनी सांगितले.

आदिवासी विकास मंत्री डॉ. वुईके यांच्या अध्यक्षतेखाली सेवा संकल्प अभियान संदर्भात बैठक झाली.  महोदयांच्या शासकीय निवासस्थानी आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच नागपूर, अमरावती, नाशिक व ठाणे विभागाचे अपर आयुक्त, आयुक्त गोपीचंद कदम तसेच सर्व प्रकल्प अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर द्यावा –

१७ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत अभियानाचे नियोजन करून प्रत्येक प्रकल्प अधिकाऱ्याने आपल्या कार्यक्षेत्रातील उपक्रमांचे वेळापत्रक सादर करावे. योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांचे अनुभव व प्रतिक्रिया घेऊन जास्तीत जास्त प्रसिद्धी देण्यात यावी. लोकप्रतिनिधींच्या सहभागातून गावपातळीवर जनजागृती कार्यक्रम आयोजित करून योजनांची माहिती थेट जनतेपर्यंत पोहोचवण्यावर भर द्यावा.

राणी दुर्गावती जयंतीनिमित्त ५ ऑक्टोबर रोजी अमरावती येथे महिला बचत गटांचा विशेष कार्यक्रम आयोजित  करून त्यांच्या प्रकल्पाचा आढावा घेण्यात यावा..यासाठी बचत गटांची संख्या, त्यांना देण्यात आलेले अर्थसहाय्य, निवडलेले व्यवसाय व झालेली प्रगती याची माहिती प्रकल्पनिहाय तयार ठेवून योग्य प्रचार-प्रसिद्धी करण्यावर भर द्यावा. वनहक्क लाभार्थ्यांना त्यांच्या हक्कांची माहिती व आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्याची कार्यवाही गतिमान करावी. तसेच जातीचे प्रमाणपत्र व इतर आवश्यक कागदपत्रे नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मोहीम राबवून कागदपत्रांची पूर्तता करावी, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. वुईके यांनी दिले.

आश्रमशाळा व वसतिगृहांतील पाणीपुरवठ्याच्या समस्या तातडीने सोडवून आवश्यक पर्यायी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीचा अद्ययावत डेटा ठेवावा. ॲनिमियाबाबत जनजागृती व आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांशी समन्वय साधून आरोग्य शिबिराला चांगल्या प्रकारे प्रसिद्धी करुन प्रसिद्धीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. वुईके यांनी दिले.

विभागाच्या योजनांची माहिती पॅम्पलेट, माहितीपत्रके व प्रचाररथाच्या माध्यमातून गावागावात पोहोचवावी. विभागाच्या कामाची अद्ययावत माहिती उपलब्ध ठेवून शासनस्तरावर आवश्यक माहिती तातडीने सादर करण्याची तयारी ठेवावी. संबंधित विभाग, लोकप्रतिनिधी आणि प्रकल्प अधिकारी यांच्या समन्वयातून ‘सेवा संकल्प अभियान’ प्रभावीपणे राबवावे, असे निर्देश मंत्री डॉ अशोक वुईके दिले.

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यातील 100 गावांत विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका; 200 गावांत ‘आदर्श सेवा केंद्रे’ उभारण्यात येणार

बातमी शेअर करा !
Share
Tags: marathi newsseva sankalp abhiyansuvarna khandesh livetribal development departmenttribal development minister dr ashok uike

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली फसवणूक! बनावट वेबसाइटपासून सावध राहण्याचे आवाहन

लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली फसवणूक! बनावट वेबसाइटपासून सावध राहण्याचे आवाहन

October 30, 2026
“वडिलांचा प्रदीर्घ अनुभव पाठीशी, शेतकऱ्यांसाठी उत्तम काम करणार”, JDCC बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर सुमित पाटील यांचा निर्धार

“वडिलांचा प्रदीर्घ अनुभव पाठीशी, शेतकऱ्यांसाठी उत्तम काम करणार”, JDCC बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर सुमित पाटील यांचा निर्धार

October 29, 2026
धानवड ग्रामपंचायतीला कुलूप, ग्रामपंचायत अधिकारीही गैरहजर; जळगावच्या ZP CEO करिश्मा नायर यांनी केली थेट निलंबनाची कारवाई

धानवड ग्रामपंचायतीला कुलूप, ग्रामपंचायत अधिकारीही गैरहजर; जळगावच्या ZP CEO करिश्मा नायर यांनी केली थेट निलंबनाची कारवाई

October 29, 2026
पशुसंवर्धन विभागाचे काटेकोर नियोजन; दुष्काळग्रस्त 305 तालुक्यांत पशुधनाची ‘भारत पशुधन’ प्रणालीवर नोंदणी करण्याचे आवाहन

पशुसंवर्धन विभागाचे काटेकोर नियोजन; दुष्काळग्रस्त 305 तालुक्यांत पशुधनाची ‘भारत पशुधन’ प्रणालीवर नोंदणी करण्याचे आवाहन

October 29, 2026
Pachora News: दिवाळीत रात्री 10 वाजेनंतर फटाके वाजविण्यास मनाई; ध्वनी व हवा प्रदूषण टाळण्याचे प्रशासनाचे आवाहन

Pachora News: दिवाळीत रात्री 10 वाजेनंतर फटाके वाजविण्यास मनाई; ध्वनी व हवा प्रदूषण टाळण्याचे प्रशासनाचे आवाहन

October 29, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 5 हजारांची अग्रीम मदत; 7 हजार 500 कोटींच्या निधीला मंजुरी, मदतीचे निकष आणि पात्रता काय?

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 5 हजारांची अग्रीम मदत; 7 हजार 500 कोटींच्या निधीला मंजुरी, मदतीचे निकष आणि पात्रता काय?

October 29, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page