जळगाव, 13 सप्टेंबर : तळागाळातील मागास जनतेला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुरुवातीपासूनच करत आहे, असे प्रतिपादन माजी पालकमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते गुलाबराव देवकर यांनी केले. गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून असोदा येथील शेकडो आदिवासी तरूणांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते.
यांची होती उपस्थिती –
पक्षात प्रवेश केलेल्या तरूणांचे स्वागत करत त्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जळगाव तालुकाध्यक्ष बापू परदेशी, बरकत अली, मजूर फेडरेशनचे माजी सभापती लीलाधर तायडे, नीलेश पाटील तसेच असोदा येथील शिवाजी भैया पाटील, ग्रामपंचायतीचे सदस्य हेमंत पाटील, धवल पाटील, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे अध्यक्ष सचिन माळी, योगेश भोळे, खेमचंद महाजन, महारू कोळी, युगंधर पाटील, दीपक साळवे, सचिन कोळी, सागर पाटील आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात ‘यांनी’ केला प्रवेश –
अजय बुधो भिल, संतोष सुरेश सोनवणे, गणेश राजू भिल, राहुल बुधो भिल, अजय भाईदास भिल, दिलीप रामसिंग भिल्ल, राहुल सुकदेव गायकवाड, शंकर दिनकर भिल, गणेश देविदास भिल, श्रावण सुभाष भिल, दिलीप रामसिंग भिल, संतोष बाळू भिल, सचिन सुकदेव गायकवाड, दीपक गिरधर भिल, मंगेश दीपक भिल, सागर संजय भिल, विशाल पिंटू भिल, समाधान भास्कर भिल, गोकूळ सुरेश भिल, भैया सुभाष भिल, कैलास भीकन भिल, भरत सुरेश भिल, तानाजी गोवर्धन भिल, जयेश पिंटू भिल, आदित्य संजय भिल, जयेश दशरथ भिल, बुधो भिल, योगेश रवींद्र भिल, सुनील वसंत भिल, किशोर भिल, दिनकर भिल, शरद भास्कर भिल, विनायक वसंत भिल, कैलास पंडीत सोनवणे, छोटू मधुकर भिल, रवींद्र हरी भिल, नरेश भिल, अनिक पुंडलिक गायकवाड, आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.
हेही वाचा : कपाशीच्या पिकात गांजाची लागवड, जळगाव तालुक्यातील भोकर येथील प्रकार उघड, एकाला अटक