सुनिल माळी, प्रतिनिधी
पारोळा, 6 मार्च : पारोळा येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील शेलार नगरमध्ये ओमनीने अचानक पेट घेतल्याने दोन गाड्या जळून खाक झाल्याची घटना आज दुपारी घडली. दरम्यान, या घटनेत कुठलीही जीवितहानी घडलेली नाही.
काय आहे संपूर्ण बातमी? –
पारोळा शहरातील शेलार नगरमध्ये गॅरेज जवळ आज दुपारी ओमनीमध्ये गॅस भरताना तसेचकाम करताना अचानक गाडींच्या वायरींना शॉर्टसर्किट झाल्यामुळे ओमनीतील गॅस हंडीने पेट घेत मोठा गुळाला निर्माण झाला होता. त्याच बाजूस लागलेली छोटा हत्ती गाडीला देखील आग लागल्याने तीही जळून खाक झाली आहे. तर बाजूलाच असलेली एक कार तिलाही आगीचा फटका बसलेला असून मोठ्या प्रमाणात गाड्यांचे नुकसान झालेले आहे.
पारोळा शहरात झालेल्या या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवित हानी झालेली नसून शेलार नगर भागातील नागरिकांनी सदर घटना पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. याबाबत एका ओमनीसह 11 खाली सिलेंडर पोलिसांनी जप्त केलेले असून रात्री उशिरापर्यंत पुरवठा अधिकारी आर. व्ही. महाडिक हे पारोळा पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी आलेले असतांना उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.