नागपूर, 30 सप्टेंबर : नागपूर येथे विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिलच्या वतीने “अमेझिंग विदर्भ, सेंट्रल इंडिया टुरिझम” या सेमिनारचे आयोजन करण्यात आले. दरम्यान, या सेमिनारला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती होती. सर्व काही सरकारच्या भरवशावर होत नाही. त्यामुळे, व्यावसायिकांनी गुंतवणूक प्रक्रियेतून सरकारला दूर ठेवले पाहिजे. माझे तर असं मत आहे की, सरकार विषकन्या आहे. सरकार ज्याच्यासोबत जाईल त्याला बुडवते, यावेळी असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थितांसोबत संवाद साधताना व्यक्त केले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मोठं विधान –
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, विदर्भाला नैसर्गिक एडवांटेज आहे. विदर्भात चांगले आणि मोठ्याप्रमाणात जंगल आहेत. मात्र, विदर्भात पर्यटन वाढीसाठी प्रमुख समस्या म्हणजे विदर्भातील गुंतवणूकदार हे असून गुंतवणूक करण्यासाठी हे गुंतवणूकदार समोर येत नाहीत. दरम्यान, व्यावसायिकांनी हे समजून घेतले पाहिजे की, सर्व काही सरकारच्या भरवशावर होत नाही. तर काही वेळेस सरकारला दूर ठेवावे लागतं. तसेच सरकार विषकन्या आहे. ती ज्याच्या सोबत जाईल त्याला बुडवतेच, असा मिश्किल टोलाही मंत्री गडकरींनी यावेळी लगावला.
ऑक्सीजन बर्ड पार्कचे लोकार्पण –
महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपुरात एका आगळावेगळ्या ऑक्सिजन बर्ड पार्कचे लोकार्पण झाले. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून हे विशेष पार्क भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पुढाकारातून नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-44 वर ऑक्सीजन बर्ड पार्क नावाने साकारण्यात आले आहे. दरम्यान, एकूण 14.32 कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प असून जवळपास 20 एकरमध्ये साकारण्यात आला आहे.
हेही पाहा : जळगाव जिल्ह्यात ‘या’ तारखेपासून पुन्हा पावसाची शक्यता, आजचा काय आहे नेमका हवामान अंदाज?