भडगाव, 20 ऑक्टोबर : भडगाव तालुक्यातील अंतुर्ली (बु) या गावाच्या उपसरपंचपदी प्रतिभाबाई प्रवीण पाटील यांची उपसरंपचपदी निवड करण्यात आली आहे. त्याप्रसंगी अंतुली बु गावाच्या लोकनियुक्त सरपंच उषाबाई भाईदास कोळी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
जळगाव जिल्ह्याच्या भडगाव तालुक्यातील अंतुर्ली बु ग्रामपंचायत उपसरपंचपदी प्रतिभाबाई प्रवीण पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी अंतुली बु गावाचे लोकनियुक्त सरपंच उषा भाईदास कोळी, ग्रामपंचायत ग्रामसेवक मिलिंद महारु पाटील तसेच ग्रामपंचाय सदस्य मनोज रामराव पाटील, मनोज प्रकाश पाटील, धनश्री लक्ष्मण पाटील, सखुबाई चंद्रभान बनकर, ज्योतीबाई दीपक भिल, बालू छोटूलाल मोरे उपस्थित होते.

तसेच त्याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती जयवंतराव गंगाराम पाटील, मा. नगरसेवक रणजीत अभिमन्यू पाटील (सर), मा. सरपंच लक्ष्मण साहेबराव पाटील, मा. सरपंच रवींद्र शामराव पाटील, शंकर दगा पाटील, मा. सरपंच दादाभाऊ चंद्रभान बनकर, तसेच गावातील विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, व्हा. चेअरमन, सर्व संचालक मंडळ, गावातील जेष्ठ वरिष्ठ मान्यवर इ. लोकांनी नवनिर्वाचित उपसरपंच प्रतिभाबाई प्रवीण पाटील यांचा सत्कार करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.