जळगाव, 16 सप्टेंबर : “येणार नहीओत हो…खोटं सांगिरायनात त्या..”, असे ऐराणीत म्हणत ज्यावेळी बँक खात्यात पैसे आलेत त्यावेळी हेच प्रत्यक्षात पैसे आल्याचे सांगत होते, असे प्रत्युत्तर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी लाडकी बहिण योजनेवर टीका करणाऱ्यांना दिलंय. महिलांनो लाडके बहिण योजनेचे पैसे बंद होणार नाहीत आणि म्हणून कुणाच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहनही पालकमंत्री पाटील यांनी केले. धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते काल 1350 मुलींना सायकलींचे वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
लाडकी बहिण योजनेवरून विरोधकांना प्रत्युत्तर –
आमच्या सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. यावेळी पैसे मिळणार नाही असे सांगितलं जात होते. मात्र, पैसे मिळाले. आता म्हणतात की निवडणुकीनंतर योजना बंद होईल. मात्रा, अडीच वर्षे त्यांनी काय केले नाही. मीच काय माझ्यापेक्षा जेष्ठ राजकारणी आहेत त्यांना पण विचारा, अशा शब्दात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांकडून लाडकी बहिण योजनेवर केल्या जात असलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
View this post on Instagram
गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, देशातले एकमेव राज्य आहे की, ज्या ठिकाणी मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय म्हणजे एकनाथ शिंदे दाढीवाल्याने घेतला आहे. सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. महिलांना अर्ध टिकीट केले. मोठ्या आनंदात महिला भगिनी आता बसने प्रवास करतात. दरम्यान, हे एकनाथ शिंदेने केलं दाढीवाल्याने, ते बी दाढीवाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी बी दाढीवाले आणि गुलाबराव दाढीवाले आता लाईन लगी है सब”, असेही ते म्हणाले.
गुलाबराव देवकर यांच्यावर जोरदार टीका –
मंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, बरेच राजकारणी लोक माझ्यावर टीका करतात. मात्र, मी सायकल देतो तुम्ही टायर तर देऊन बघा. कपाळ करंट्यानहो तुम्हाला करता आले नाही. तुम्हाला फक्त मजूर फेडरेशनच कमिशन घेता येते. बाकी दुसरे काही करता येत नाही असे म्हणत कमिशनमधून थोडं वाट ना बाबा, दोन हजारांची पावती फाडतो आणि चार वेळेस मोबाईल आणि व्हाट्सअपवर टाकतो”, अशा शब्दांत मंत्री गुलाबराव पाटील यांनी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यावर हल्लाबोल केला.