• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

Girish Mahajan on Union Budget : हे आरोग्य क्षेत्रासाठी ऐतिहासिक पाऊल, केंद्रीय अर्थसंकल्पावर मंत्री गिरीश महाजन नेमकं काय म्हणाले?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 1, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
Girish Mahajan on Union Budget 2025

Girish Mahajan on Union Budget : हे आरोग्य क्षेत्रासाठी ऐतिहासिक पाऊल, केंद्रीय अर्थसंकल्पावर मंत्री गिरीश महाजन नेमकं काय म्हणाले?

मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत 2025-26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. आरोग्य क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी 95,957.87 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, यामुळे आरोग्य सेवांमध्ये मोठे सुधार होण्याची शक्यता आहे. या अर्थसंकल्पातील तरतुदींवर प्रतिक्रिया देताना राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन म्हणाले, “हे आरोग्य क्षेत्रासाठी ऐतिहासिक पाऊल असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे देशातील आरोग्य व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडणार आहे.”

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसाठी 9,406 रुपयांची कोटींची तरतूद करण्यात आली आहे, त्यामुळे गरीब व गरजू लोकांसाठी आरोग्य सुविधा वाढणार आहेत. तसेच, प्रधानमंत्री आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियानाला 4,200 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे, ज्यामुळे आरोग्य सेवा पायाभूत सुविधा मजबूत होणार आहेत.

राष्ट्रीय आरोग्य अभियानासाठी 37,226.92 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, ग्रामीण व शहरी भागातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी हा निधी वापरण्यात येणार आहे. राष्ट्रीय टेली मानसिक आरोग्य कार्यक्रमासाठी 79.6 कोटी रुपयांची तरतूद करून डिजिटल मानसिक आरोग्य सेवांना चालना दिली जाणार आहे.

कर्करोग उपचार सुविधांसाठी मोठी तरतूद करण्यात आली असून, 2025-26 दरम्यान 200 नवीन कर्करोग केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. पुढील तीन वर्षांत सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये डे-केअर कॅन्सर सेंटर्स उभारण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे, यामुळे दुर्गम भागांमध्येही उपचार उपलब्ध होतील.

वैद्यकीय शिक्षणासाठी मोठी तरतूद करण्यात आली असून, पुढील वर्षभरात 10 हजार नवीन वैद्यकीय जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पुढील पाच वर्षांत 75 हजार जागा वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गेल्या 10 वर्षांत 130 टक्के वाढ होऊन पदवीपूर्व आणि पदव्युत्तर वैद्यकीय जागांची संख्या 1.1 लाखांवर पोहोचली आहे.

या संपूर्ण अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन म्हणाले, “ही तरतूद भारताच्या आरोग्य क्षेत्रात क्रांती घडवणारी ठरेल. वैद्यकीय शिक्षणाच्या संधी वाढल्याने ग्रामीण भागातील डॉक्टरांची संख्या वाढेल. तसेच, कर्करोग उपचार केंद्रांमुळे हजारो रुग्णांना वेळेत उपचार मिळतील.” तसेच केंद्रीय अर्थसंकल्पातील या तरतुदींचा लाभ महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेला मोठ्या प्रमाणावर मिळेल, असेही महाजन यांनी सांगितले.

हेही वाचा – Gulabrao Patil on Union Budget : “जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी…”, केंद्रीय अर्थसंकल्पावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची महत्त्वाची प्रतिक्रिया

बातमी शेअर करा !
Share
Tags: girish mahajanhealthmaharashtraminister girish mahajanunion budgetunion budget 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

VIDEO | अमळनेरमध्ये धाडसी बचाव कार्य; पुराच्या पाण्यात अडकलेल्या एक महिन्याच्या चिमुकल्यासह कुटुंबाची सुटका

VIDEO | अमळनेरमध्ये धाडसी बचाव कार्य; पुराच्या पाण्यात अडकलेल्या एक महिन्याच्या चिमुकल्यासह कुटुंबाची सुटका

August 1, 2026
Chalisgaon News: डेंग्यू प्रतिरोध महिन्यानिमित्त चाळीसगावात जनजागृती अभियान संपन्न

Chalisgaon News: डेंग्यू प्रतिरोध महिन्यानिमित्त चाळीसगावात जनजागृती अभियान संपन्न

August 1, 2026
शेंदुर्णी येथील श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती मार्गदर्शन सत्र संपन्न

शेंदुर्णी येथील श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती मार्गदर्शन सत्र संपन्न

July 31, 2026
VIDEO | भडगाव तालुक्यातील बात्सर येथे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बचाव कार्य; 8 जणांची सुखरूप सुटका

VIDEO | भडगाव तालुक्यातील बात्सर येथे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बचाव कार्य; 8 जणांची सुखरूप सुटका

July 31, 2026
Jalgaon Rain: जळगाव जिल्ह्यात पावसाचा कहर; कुठे काय घडलं? वाचा सविस्तर अपडेट

Jalgaon Rain: जळगाव जिल्ह्यात पावसाचा कहर; कुठे काय घडलं? वाचा सविस्तर अपडेट

July 31, 2026
VIDEO | “मला मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिलाय, की……!”; अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुद्यावर आमदार किशोर आप्पा पाटील यांचा मोठा दावा

VIDEO | “मला मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिलाय, की……!”; अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुद्यावर आमदार किशोर आप्पा पाटील यांचा मोठा दावा

July 31, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page