संदीप पाटील, प्रतिनिधी
पारोळा, 11 मे : राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी 11 मतदारसंघात चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. यामध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघाचा देखील समावेश आहे. हे मतदान 13 मे रोजी होणार असल्याने या पार्श्वभूमीवर पारोळा शहर हद्दीत भरणारा आठवडे बाजारासंदर्भात प्रशासनाचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
काय आहे प्रशासनाचा निर्णय –
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मुळे दिनांक 12 मे 2024 रविवार रोजी पारोळा शहर हद्दीत भरणारा आठवडे बाजार गर्दीमुळे मतदान साहित्य ने-आण करणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होणार असल्याने हा बाजार बंद राहणार आहे. मुंबई मार्केट अँड फेअर ॲक्ट 1862 चे कलम 5 (अ) व (क )अन्वये मा. जिल्हा दंडाधिकारी,जळगाव तथा जिल्हाधिकारी सो यांचे आदेशाने हा बाजार बंद राहणार आहे. तसेच रविवार ऐवजी 14 मे, मंगळवार होजी हा बाजार भरणार आहे. दरम्यान, प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाची सर्व नागरिक तसेच व्यापारी, विविध जिन्नस, विक्रेते यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन मुख्याधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.
13 मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान –
राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा चौथा टप्पा 13 मे रोजी पार पडणार आहे. यामध्ये खान्देशातील जळगाव, रावेर आणि नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचा देखील समावेश आहे.
हेही वाचा : जळगाव, रावेर, नंदूरबारमध्ये आज प्रचाराचा शेवटचा दिवस, खान्देशात नेमकी काय आहे परिस्थिती?