मुंबई – माझ्या नावाने खोटी माहिती पसरवून काही माध्यमांकडून महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नये, अशी विनंती आमदार आणि राज्याच्या महिला आणि बालविकास विभागाच्या माजी मंत्री आदिती तटकरे यांनी केली आहे.
महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाकडी बहीण योजनेसंदर्भात वेगवेगळ्या चर्चा केल्या जात आहेत. ज्या महिलांच्या घरी चारचाकी वाहने आहेत त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही. काही महिलांना यातून वगळण्यात येणार आहे, त्यांच्या अर्जांची पडताळणी केली जाणार आहे, अशी चर्चा होत असताना आदिती तटकरे यांनी ट्विट करत अशा कोणत्याही अफवांना बळू पडू नये, असे आवाहन केले.
आमदार आदिती तटकरे यांनी काय पोस्टमध्ये काय म्हटलं?
सोशल मीडिया फ्लॅटफॉर्म एक्सवर लिहिताना आमदार आदिती तटकरे यांनी लिहिले की, ‘माझ्या नावाने खोटी माहिती पसरवून काही माध्यमांकडून महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी माध्यमांसोबत संवाद साधताना अर्थसंकल्पात योग्य प्रकारे नियोजन करून कबूल केलेल्या 2100 रुपयांच्या लाभाबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जवळपास 2 कोटी 34 लाख महिलांना लाभ मिळत आहे. ही योजना राबवत असताना सर्व लाभार्थी महिलांची पडताळणी करूनच त्यांना लाभ वितरित करण्यात आला आहे. म्हणून, सध्या नोंदणी करत असलेल्या लाभार्थ्यांच्या पडताळणीच्या वृत्तात कोणतेही तथ्य नाही, अशी कोणतीही पडताळणी होणार नाही.
कृपया याबाबत कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नये, ही सर्वांना नम्र विनंती’!, असे आमदार आदिती तटकरे म्हणाल्या.
माझ्या नावाने खोटी माहिती पसरवून काही माध्यमांकडून महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस ( @Dev_Fadnavis ) यांनी माध्यमांसोबत संवाद साधताना अर्थसंकल्पात योग्य प्रकारे नियोजन करून कबूल केलेल्या २१००… pic.twitter.com/iV8g9Vxbfo
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) December 10, 2024
मुख्यमंत्री माझी लाकडी बहीण योजनेबाबत –
राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना सुरु करण्यास महाराष्ट्र शासनाने 28 जून 2024 रोजी मान्यता दिली. या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिना 1500 रुपये असा आर्थिक लाभ DBT द्वारे देण्यात येत आहे.