जळगाव : मार्च महिन्यात जळगाव जिल्ह्यात प्रचंड उकाडा जाणवायला लागला होता. मात्र, सोमवारी काही अंशी वातावरण बदलल्याचे दिसले. रविवारी जळगाव जिल्ह्यातील तापमान हे 40 अंशावर गेले होते. यानंतर सोमवारी ते 38 अंशांवर आले. ढगाळ वातावरणामुळे जळगाव जिल्ह्यातील तापमानात घट झाली. यानंतर आता हवामान विभागाने जळगाव जिल्ह्यात दोन दिवसांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे.
समुद्राकडून वाहात असलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे जिल्ह्यात पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सोमवारपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. यासह सोमवारी दिवसभर 12 ते 15 किमी. वेगाने वारे वाहत होते. यानंतर आता जळगावसह धुळे, नंदुरबार या जिल्ह्यामध्येही पाऊस होण्याची शक्यता आहे.
जळगाव जिल्ह्यात आगामी दोन दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मंगळवारी व बुधवारी जिल्ह्यात वादळासह गारपिटीसह जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दोन दिवस पावसाचे, पाच दिवस ढगाळ वातावरणाचे जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
जळगाव जिल्ह्यात 1 व 2 एप्रिल रोजी पावसाचा जोर राहू शकतो. मात्र, त्यानंतर पावसाची शक्यता कमी आहे. पण दुसरीकडे राज्यातील इतर भागांमध्ये ७ एप्रिलपर्यंत पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता –
जळगाव जिल्ह्यात 2 दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पण असे असले तरी 7 एप्रिलपर्यंत जळगाव जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम राहू शकते, अशी शक्यता आहे. त्यानंतर मात्र, जिल्ह्यातील तापमानात वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
आगामी पाच दिवस असे असेल जळगाव जिल्ह्यातील हवामान –
दिनांक तापमान वातावरणाची स्थिती
1 एप्रिल 35 अंश वादळी वाऱ्यासह किंवा गारपिटीसह पाऊस
2 एप्रिल 33 अंश गडगडाटासह पावसाचा अंदाज
3 एप्रिल 35 अंश काही अंशी ढगाळ वातावरण
4 एप्रिल 36 अंश काही अंशी ढगाळ वातावरण
5 एप्रिल 37 अंश दिवसा कोरडे, सायंकाळनंतर काही अंशी ढगाळ वातावरण