सुनील माळी, प्रतिनिधी
वेळी (पारोळा), 28 फेब्रुवारी : पारोळा तालुक्यातून शेतकऱ्याचा विहीरीतील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. वेळी या गावात काल रात्री ही घटना घडली. लक्ष्मण दादाभाऊ माळी (वेळी, 24 वर्ष) असे मृत तरूणाचे नाव आहे.
काय आहे संपूर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, वेळी गावातील लक्ष्मण दादाभाऊ माळी हा काल (27 फेब्रुवारी) गुरांना पाणी पाजण्यासाठी त्यांच्या शेतात इलेक्ट्रीक मोटार सुरू करण्यासाठी विहीरजवळ गेला होता. तो बराच वेळ घरी परत न आल्यामुळे त्याचे काका शोध घेण्यासाठी शेतात गेले असता विहीरीजवळ एक चप्पल आणि विहीरीमध्ये एक चप्पल तरंगताना दिसून आली.
यावरून गावकऱ्यांच्या मदतीने लक्ष्मणला विहीरी बाहेर काढल्यानंतर खासगी वाहनाने पारोळा शहरातील कुटीर रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. याप्रकरणी पारोळा पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहायक फौजदार इकबाल शेख करत आहे.
हेही वाचा : कंत्राटदाराकडे 15 हजाराची मागितली लाच अन् एसीबीने विद्युत निरीक्षकाला पडकले रंगेहाथ