भुसावळ, 26 सप्टेंबर : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना भुसावळ तालुक्यातून हादरवणारी घटना समोर आली आहे. प्रेम संबंधातून होणाऱ्या भांडणातून तरूणाने 28 वर्षीय विवाहितेचा खून केल्याची घटना घडली आहे. साकेगाव येथे ही घटना घडली असून सोनाली महेंद्र कोळी (वय 28 रा. साकेगाव ता. भुसावळ) असे मयत विवाहितेचे नाव आहे. याबाबत संशयित आरोपी सागर रमेश कोळी (वय 28) याला अटक करण्यात आली असून या घटनेत एक व्यक्ती जखमी झाल्याचे समजते.
नेमकं काय घडलं? –
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे सोनाली कोळी ही पती व लहान मुलांसह वास्तव्यास होती. सोनाली या महिलेचे गावातीलच एका सागर कोळी या तरुणासोबत प्रेम संबंध होते. या प्रेम संबंधमधून त्यांच्यामध्ये नेहमी खडके उडत असत. दरम्यान, 25 सप्टेंबर रोजी रात्री सागर कोळी याने सोनाली महिंद्र कोळी हिच्याशी पुन्हा भांडण केले. या भांडणामधून सागर कोळी याने सोनाली कोळी हिच्या पाठीवर, पोटाच्या बाजूला, उजव्या हाताला, चाकूने भोसकून जबर दुखापत केली. सदर प्रकरणात गंभीर झालेल्या सोनालीला भुसावळ ग्रामीण रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.
हेही पाहा : Jalgaon जिल्ह्यातील एमरजन्सी लोडशेडिंग कधी बंद होणार?, IAS Ayush Prasad Exclusive Interview
संशयित आरोपीला पोलिसांना केली अटक –
याप्रकरणी विनोद कुभांर यांच्या दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात सागर कोळी विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी संशयित आरोपी सागर कोळी यास ताब्यात घेतले असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव हे करीत आहेत.
हेही पाहा : Yogendra Puranik Interview : जपानमधील मराठमोळे आमदार योगेंद्र पुराणिक यांची विशेष मुलाखत