ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 4 ऑक्टोबर : पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील कैलादेवी मंदीरा जवळ नवरात्रोत्सवानिमित्त दांडिया गरबा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, या कार्यक्रमात काल रात्री 26 वर्षीय युवकाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. लखन प्रेमलाल वाधवानी असे मृत युवकाचे नाव असून या घटनेमुळे शहरातील दाडिंया प्रेमींमध्ये शोककळा पसरली आहे.
नेमकं काय घडलं? –
शहरातील भडगाव रोडवरील कैलादेवी मंदीरा जवळील दांडीया गरबा जल्लोष कार्यक्रमात सिंधी कॉलनीतील रहिवासी असलेला लखन प्रेमलाल वाधवानी हा युवक दाडिंया खेळत असताना त्याची तब्येती खराब झाली. दरम्यान, त्याला तात्काळ विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये उपचारसाठी दाखल करण्यात आले. यावेळी डॉ. भुषण मगर यांच्यासह वैद्यकीय टीमने शर्थीचे प्रयत्न करुन देखील त्यांना यश मिळाले नाही. दरम्यान, त्याला उपचारा दरम्यान मृत घोषित करण्यात आले.
दांडिया किंग म्हणून ओळख –
लखन वाधवानी याची वार्ता शहरात पसरली असता सर्वांनी हॉस्पिटलकडे धाव घेतली. तसेच काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी देखील तात्काळ भेट दिली. लखन वाधवानी या युवकाची दांडिया किंग म्हणून दांडिया प्रेमीमध्ये प्रसिद्ध होता. तसेच दरवर्षी दांडिया किंगचा देखील मानकरी ठरत होता. लखन हा एकुलता एक मुलगा होता तसेच तो चाळीसगाव येथील एका खासगी पेट्रोल पंप वर कामाला होता आणि घरातील कर्ता होता. असे असताना त्याच्या अचानक जाण्याने शहरात शोककळा पसरली आहे.
हेही पाहा : महाराष्ट्राच्या नवदुर्गा: माजी नेमबाजपटू Anjali Bhagwat महिला सुरक्षेवर काय म्हणाल्या?, विशेष मुलाखत