पाचोरा, 23 जून : साहित्य अकादमीच्या वतीने देण्यात येणारा अत्यंत प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2023 आज जाहीर करण्यात आला. यात मराठी भाषेसाठी पाचोऱ्याची कन्या विशाखा विश्वनाथ हिच्या कवितासंग्रहाला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. “स्वत:ला स्वत:विरुद्ध उभे करताना” या कवितासंग्रहासाठी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
विशाखा विश्वनाथ हिच्याबद्दल –
विशाखा विश्वनाथ ही मूळ खान्देशातील रहिवासी आहे. विशाखा विश्वनाथ हिचे शिक्षण मुंबई विद्यापीठातून झाले आहे. तिने मुंबई विद्यापीठातून फिल्म टेलिव्हिजन आणि न्यू मीडिया प्रॉडक्शन या विषयात पदवी घेतली आहे. त्यानंतर तिने पुढे मराठी या विषयात एम. ए.चेही शिक्षण घेतले आणि सध्या ती मार्केटिंग या विषयामध्ये एमबीएचे शिक्षण घेत आहे.
विशाखा हिचे आजोबा हे नोकरीच्या निमित्ताने पाचोरा येथे स्थायिक झाले. मात्र, यानंतर तिचे वडील हे नोकरीच्या निमित्ताने मुंबईला स्थायिक झाले. सध्या तिचे वडील विश्वनाथ गढरी हे मुंबई महानगरपालिकेत शिक्षण विभागात कनिष्ट पर्यवेक्षक म्हणून कार्यरत आहे.
विशाखा ही मागील चार वर्षांपासून मराठी, हिंदी चित्रपट आणि वेबसीरीजसाठी कॉपी रायटिंग आणि कॅम्पेन प्लॅनर म्हणून काम करत आहे. आतापर्यंत मी जवळपास 50 हिंदी, मराठी चित्रपट आणि वेबसिरीजच्या डिजिटल कॅम्पेनचा मी भाग राहिली आहे, असे तिने ‘सुवर्ण खान्देश लाईव्ह‘सोबत बोलताना सांगितले.
प्रेस विज्ञप्ति : #साहित्यअकादेमी ने 20 भाषाओं में अपने युवा पुरस्कार 2023 की घोषणा की।#AmritMahotsav @AmritMahotsav @PMOIndia @kishanreddybjp @arjunrammeghwal @M_Lekhi @MinOfCultureGoI @secycultureGOI @ksraosahitya @PIB_India @PIBCulture @MIB_India @DDNational#SahityaAkademi… pic.twitter.com/1pCRbuLEr2
— Sahitya Akademi (@sahityaakademi) June 23, 2023
साहित्य आणि सिनेमा या दोन्ही क्षेत्रात रस आहे. मागील चार वर्षांपासून मी यातच काम करते आहे आणि पुढेही मला यातच काम करायचं आहे, असेही तिने यावेळी सुवर्ण खान्देश लाईव्हसोबत बोलताना सांगितले. 50 हजार रुपये आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
मराठीसाठी एकूण 7 पुस्तकं शॉर्टलिस्टेट करण्यात आली होती. यामध्ये विनायक होगाडे लिखित डिअर तुकोबा या पुस्तकाचाही समावेश आहे. मात्र, शॉर्टलिस्ट झालेल्या या 7 पुस्तकांमध्ये विशाखा विश्वनाथ या पाचोऱ्याच्या कन्येचा कविता संग्रहाला हा पुस्कार जाहीर करण्यात आला आहे. साहित्य अकादमीच्या वतीने देण्यात येणारा साहित्य अकादमी युवा पुरस्कार हा पुरस्कार अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो. विशाखा हिला हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.