जळगाव, 10 सप्टेंबर : राज्यात ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षापासून तालुका, जिल्हा, महसूल विभाग व राज्य अशा चार स्तरांवर ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ हे पुरस्कार अभियान राबविण्यात येणार आहे. दरम्यान, आपले गाव, आपला जिल्हा समृद्ध करण्यासाठी या अभियानात गावोगाव उत्साहाने सहभाग घेऊन विकासाच्या वाटचालीत हातभार लावावा, असे आवाहन जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी मिनल करनवाल यांनी केले.
सीईओ मिनल करनवाल यांचे आवाहन –
मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानातबाबत बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल म्हणाल्या की, राज्य सरकारने मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान राबविण्याची सुरूवात केली असून प्रत्येक गावं समृद्धी झाली, असा त्यामागचा उद्देश आहे. गावातील ग्रामपंचायतची इमारत, स्मशानभूमी तसेच शाळा समृद्ध राहिल्या पाहिजे, यासाठी स्पर्धेची घोषणा करण्यात आली असून चांगली कामगिरी करणाऱ्या गावांसाठी 1 कोटी रूपयांपर्यंत बक्षिस देखील जाहीर करण्यात आले आहेत.
View this post on Instagram
गावापातळीवर कार्यशाळा सुरू –
मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानासाठी गावापातळीवर कार्यशाळा सुरू झाली आहे. या अभियानाच्या जनजागृतीसाठी तसेच प्रसिद्धीसाठी सरपंच-ग्रामसेवक यांनी गावातील सर्वांना आमंत्रित करून त्यांना माहिती करून द्यावी. तसेच 17 सप्टेंबर रोजी आयोजित असलेल्या ग्रामसभेत एक ठराव करून माझं गाव, माझं जळगाव यामध्ये जिंकलं पाहिजे म्हणून सर्वांना यामध्ये सहभागी व्हावं, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी केले.
हेही वाचा : “सरपंचांसाठी गावांच्या विकासाची मोठी संधी!” राज्य शासनाचं मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान नेमकं काय?