रायपूर, 30 जानेवारी : छत्तीसगडमधील सुकामा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या भीषण चकमकीत तीन जवान शहीद झाले तर यामध्ये 13 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.
सीआरपीएफने सुकामा जिल्ह्यातील जगरगुंडा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या टेकुलागुडेम गावात स्थानिक जनतेला मूलभूत सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने नव्याने सुरक्षा छावणी तयार केली होती. सीआरपीएफने तयार केलेल्या या छावणीवर नक्षलवाद्यांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले तर 13 पोलीस कर्मचार जखमी झाले आहेत.
नेमकं काय घडले? –
छत्तीसगड मधील जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 120 किमी अंतरावर असलेल्या नक्षलग्रस्त भागात टेकलगुडा येथे कँप उभारण्यासाठी जवान आले होते. दरम्यान, दुपारी बारा वाजेच्या सुमारास नक्षलवाद्यांनी अत्याधुनिक शस्रांसह सीआरपीएफच्या जवानांवर चौफेर हल्ला करत गोळ्या झाडायला सुरुवात केली. छावणीच्या सुरक्षेत तैनात असलेले कोब्रा आणि एसटीएफच्या जवानांनीही प्रत्युत्तरात गोळीबार केला. हा गोळीबार दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू होता.
जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक –
मिळालेल्या माहितीनुसार, सुकमा पोलिसांनी आज टेकुलगुडममध्ये सुरक्षा दलाच्या जवानांसाठी नवीन कॅम्प तयार केला होता. होता. कोब्रा, एसटीएफ आणि डीआरजीचे जवान छावणीजवळील जोनागुडा-अलिगुडाकडे गस्त घालण्यासाठी निघाले होते आणि याच दरम्यान, जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. तत्पूर्वी 2021 मध्ये याच ठिकाणी नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे 23 जवान शहीद झाले होते.
हेही वाचा : घरची परिस्थिती बेताची, आयफोनची मागणी पुर्ण झाली नाही म्हणून 20 वर्षांच्या मुलाची आत्महत्या