• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

विधी सेवा महाशिबिर व शासकीय सेवा योजना महामेळाव्याचे पाचोऱ्यात 19 जानेवारीला आयोजन; नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 15, 2025
in पाचोरा, ताज्या बातम्या
Legal Services Mahashibir and Government Services Scheme Mahamelava will be organized in Pachora on January 19 2025

विधी सेवा महाशिबिर व शासकीय सेवा योजना महामेळाव्याचे पाचोऱ्यात 19 जानेवारीला आयोजन

जळगाव : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली; महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई; जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव; आणि तालुका विधी सेवा समिती पाचोरा तसेच पाचोरा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने विधी सेवा महाशिबिर व शासकीय सेवा योजना महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा उपक्रम “न्यायालय आपल्या दारी” या संकल्पनेवर आधारित आहे. येत्या रविवारी, 19 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता निर्मल इंटरनॅशनल स्कूल, अंतुर्ली, भडगाव रोड, पाचोरा येथे हे शिबिर संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमाबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी 13 जानेवारी रोजी पाचोरा येथील दिवाणी न्यायालय येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये दिवाणी न्यायाधीश जी. बी. औंधकर, सह दिवाणी न्यायाधीश एस. व्ही. निमसे, सह दिवाणी न्यायाधीश जी. एस. बोरा, तसेच वकील संघाचे अध्यक्ष अॅड. प्रविण पाटील व इतर वकील बांधव उपस्थित होते. या परिषदेत न्या. जी. बी. औंधकर यांनी पत्रकारांना कार्यक्रमाचे स्वरूप, उद्दिष्ट आणि महत्त्व याबद्दल सविस्तर माहिती दिली.

या पत्रकार परिषदेत न्या. औंधकर यांनी सांगितले की, “न्यायालय आपल्या दारी” या संकल्पनेच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांपर्यंत न्याय व शासकीय योजनांचा लाभ पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. “शासन आपल्या दारी” योजनेच्या धर्तीवर नागरिकांना शासकीय योजनांचे लाभ सुलभपणे मिळावेत आणि त्यांना कायदेशीर सहाय्यही उपलब्ध व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

या महाशिबिराचे उद्घाटन पालक न्यायमूर्ती मंगेश एस. पाटील व पालक न्यायमूर्ती अभय एस. वाघवसे, उच्च न्यायालय, औरंगाबाद यांच्या हस्ते होणार आहे. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगावचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण एम. क्यु. एस. एम. शेख हे राहणार आहेत. या महाशिबिराचे अतिथी म्हणून जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि महाराष्ट्र बार कौन्सिलचे पालक सदस्य अॅड. अमोल सावंत उपस्थित राहणार आहेत.

विधी सेवा महाशिबिरामध्ये न्यायालयीन यंत्रणा व शासकीय योजना यांचा प्रभावी मेळ साधला जाणार आहे. या शिबिरामध्ये नागरिकांना विविध योजनांची माहिती, अर्ज प्रक्रिया, लाभ घेण्याच्या अडचणी आणि त्यावरील उपाय यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा व महाशिबिरासंदर्भातील अधिक माहितीसाठी व मार्गदर्शनासाठी वकील संघाचे प्रतिनिधी, तालुका विधी सेवा समिती सदस्य, तसेच शासकीय विभागांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा – puja khedkar case : पूजा खेडकरला ‘या’ तारखेपर्यंत अटक होणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं?

बातमी शेअर करा !
Share
Tags: pachora

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 11, 2026
‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page