मिलिंद वाणी, प्रतिनिधी
चोपडा, 2 फेब्रुवारी : जळगाव जिल्ह्यासह राज्यातील सूतगिरण्या या अलीकडे अडचणीत सुरू आहेत. त्यांचे प्रश्न तातडीने सोडवणार आहे. कापूस उत्पादकांनाही आपण न्याय देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी दिले. चोपडा शहरातील महिला मंडळ शाळेत आयोजित स्वागत समारंभात मंत्री सावकारे बोलत होते.
रोटरी उत्सवात भाग घेण्यासाठी आलेले मंत्री संजय सावकारे यांनी आधी विश्रामगृहावर भाजप कार्यकर्त्यांशी हितगुज केली. भगिनी मंडळ संचलित महिला मंडळ शाळेत महाराष्ट्र विधानसभेचे माजी सभापती अरुण भाई गुजराती यांनी तसेच त्यांच्या विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री महोदयांचे यथोचित स्वागत केले.चोपडा शहरातील भगिनी मंडळ शाळेत आज 2 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमाराला मंत्री सावकारे यांचे आगमन झाले. यावेळी माजी आमदार कैलास बापू पाटील, जि प. मा.सभापती छन्नू झेंडू पाटील उर्फ गोरख तात्या, पीपल बँकेचे चेअरमन चंद्र हास भाई गुजराती, उपाध्यक्ष सुनील जैन, चो.सा.काचे मा. चेअरमन, एडवोकेट घनश्याम निंबाजी पाटील, रोटेरियन आशिष भाई गुजराती व मान्यवर यावेळी हजर होते.
सर्व संस्थांच्या वतीने उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सावका रेयांना शाल श्रीफळ बुके देऊन गौरवित केले.
सूतगिरणीचे संचालक, शशिकांत पाटील, चंद्रकांत पाटील, कैलास बाविस्कर, शेतकी संघाचे चेअरमन ललित बागुल, मा. सभापती एडवोकेट डीपी पाटील, शांताराम सपकाळे, आनंद मोरे, अरुण मोरे, कवी लेखक व तथा साहित्यिक-रमेश जे. पाटील, गोविंद भाई गुजराती, अश्विनी गुजराती, प्रभा बेनगुजराती, वसंतलाल गुजराती आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा : Chopda Crime News : चोपड्यात आढळला गावठी कट्टा अन् 3 जिवंत काडतूस, दोन जणांना अटक