• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

“लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, यापेक्षा अधिक…”; मुख्यमंत्र्यांचा लाडक्या बहिणींना आश्वासक आधार

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 13, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
“लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, यापेक्षा अधिक…”; मुख्यमंत्र्यांचा लाडक्या बहिणींना आश्वासक आधार

मुंबई, 12 फेब्रुवारी : “लाडकी बहीण योजना ही आमच्यासाठी केवळ आर्थिक मदत नाही, तर आमच्या जगण्याचा आधार आहे”, असे धुणी भांडी करणाऱ्या महिलांनी सांगताच “ही योजना कधीही बंद पडणार नाही!” अशी आश्वासनपर ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील धुणी भांडी काम करणाऱ्या 20 महिलांना रसिकाश्रय या संस्थाने “जीवाची मुंबई, श्रमाची आनंदवारी” या उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घडविली.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांसह झालेल्या भेटीदरम्यान अनेक महिलांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. “भांडे घासून मिळणाऱ्या 500 रुपयांत कुटुंब कसं चालवायचं, याचा प्रश्न होता. पण ‘लाडकी बहीण’ योजनेने आम्हाला मोठा आधार मिळाला,” असे म्हणताना एक वृद्ध महिलेचा गळा दाटून आला. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भावना समजून घेत “लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, यापेक्षा अधिक मदत कशी करता येईल, याचाही विचार करतोय,” असे आश्वासन दिले.

या महिलांसाठी ही भेट केवळ योजनांविषयी नव्हती, तर जीवनभर लक्षात राहणारा अनुभव होता. “आम्ही कधी विमान पाहिलं नव्हतं, पण आता आम्ही त्यातून प्रवासही केला. गेल्या दोन दिवसांत आम्हाला स्वर्गासारखी अनुभूती मिळाली,” असे एका महिलेने मुख्यमंत्र्यांना सांगितले.

या भेटीत महिलांनी आणखी एक विनंती केली की, “सन्माननिधी म्हणून मिळणारे 10 हजार रुपये दरवर्षी मिळावेत.” यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत “शासन पातळीवर या मागणीचा विचार करू,” असे सांगितले. तसेच काही वृद्ध महिला ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी पात्र नसल्याने त्यांना ‘निराधार योजना’ अंतर्गत मदत देण्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

या भेटीचे आयोजन “रसिकाश्रय” संस्थेने केले होते. “या महिलांच्या संघर्षाची जाणीव करून दिल्याबद्दल संस्थेचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अभिनंदन केले. राज्यातील गरीब जनतेचे जीवन सुसह्य करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या भेटीनंतर महिलांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. “मुख्यमंत्र्यांची भेट स्वप्नवत वाटली. लाडकी बहीण योजना कायम राहील, हे ऐकल्यावर हृदय हलकं झालं,” असे एका महिलेने समाधानाने सांगितले.

हेही पाहा : IPS Dr. Maheshwar Reddy: सोशल मीडिया, क्राइम, तरुणाई; Jalgaon SP डॉ. महेश्वर रेड्डींची विशेष मुलाखत

बातमी शेअर करा !
Share
Tags: cm devendra fadnavisladki bahin yojanamarathi newsmumbaisuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Jalgaon News: केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठक संपन्न

Jalgaon News: केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठक संपन्न

February 23, 2026
‘सरपंचांच्या सकारात्मक मानसिकतेतूनच गावाचा सर्वांगीण विकास!’, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या हस्ते ‘सरपंच संवाद’ या कार्यक्रमाचे उदघाटन

‘सरपंचांच्या सकारात्मक मानसिकतेतूनच गावाचा सर्वांगीण विकास!’, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या हस्ते ‘सरपंच संवाद’ या कार्यक्रमाचे उदघाटन

February 23, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘दिव्यांग सहाय्यक पोर्टल’ आणि मोबाईल ॲपचे उद्घाटन, नेमकं काय आहे ‘हे’ अ‍ॅप?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘दिव्यांग सहाय्यक पोर्टल’ आणि मोबाईल ॲपचे उद्घाटन, नेमकं काय आहे ‘हे’ अ‍ॅप?

February 23, 2026
जनसामान्यांना दिलासा देणारा आणि आर्थिक शिस्त राखणारा अर्थसंकल्प सादर करण्याचा प्रयत्न करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जनसामान्यांना दिलासा देणारा आणि आर्थिक शिस्त राखणारा अर्थसंकल्प सादर करण्याचा प्रयत्न करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

February 23, 2026
कृषी विभागाचे ट्रेसर्स असोसिएशन संघटनेच्या राज्याच्या अध्यक्षपदी व्यंकटेश हालिंगे, सरचिटणीस पदी सिद्धार्थ पवार व कोषाध्यक्ष पदी यशवंत जडे यांची निवड

कृषी विभागाचे ट्रेसर्स असोसिएशन संघटनेच्या राज्याच्या अध्यक्षपदी व्यंकटेश हालिंगे, सरचिटणीस पदी सिद्धार्थ पवार व कोषाध्यक्ष पदी यशवंत जडे यांची निवड

February 22, 2026
भारताच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणाऱ्या आंदोलनाचा निषेध! काँग्रेसने माफी मागावी; युवासेना जिल्हाप्रमुख जितेंद्र जैन यांची मागणी

भारताच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणाऱ्या आंदोलनाचा निषेध! काँग्रेसने माफी मागावी; युवासेना जिल्हाप्रमुख जितेंद्र जैन यांची मागणी

February 22, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page