• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

धनंजय मुंडे यांचा राजीनामा: तीन महिन्यांपुर्वी संधी हुकली अन् आता अनिल पाटलांना संधी मिळणार का?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 5, 2025
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
धनंजय मुंडे यांचा राजीनामा: तीन महिन्यांपुर्वी संधी हुकली अन् आता अनिल पाटलांना संधी मिळणार का?

जळगाव, 5 फेब्रुवारी : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात सीआयडीने दाखल केलेल्या आरोप पत्रात वाल्मिक कराडला मुख्य आरोपी करण्यात आले आहे. दरम्यान, वाल्मिक कराडची धनंजय मुंडे यांच्यासोबत असलेल्या जवळीकमुळे मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणी केली जात होती. अशातच त्यांनी काल वैद्यकीय कारणामुळे राजीनामा देत असल्याचे सांगत आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर तीन महिन्यांपुर्वी संधी हुकलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील यांना संधी मिळणार का? याकडे जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

अनिल पाटलांना संधी मिळणार का? –
अनिल पाटील हे अमळनेर विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. असे असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गटाचे ते मोठे नेते मानले जातात. यापुर्वी, पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले. यावेळी त्यांनी अजित दादा यांच्यासोबत जाणे पसंत केले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गट हा महायुती सरकारमध्ये सहभागी झाला होता. दरम्यान, हायुती सरकारमध्ये 2023 साली अनिल पाटील यांची मंत्रीपदी वर्णी लागली होती. यावेळी त्यांना आपत्ती व्यवस्थापन व मदत पुनर्वसन मंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.

मागील वर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गटाला मोठं यश मिळालं. दरम्यान, महायुती सरकारमध्ये अनिल पाटलांची पुन्हा एकदा मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता असताना देखील त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्रीपदाच्या यादीतून वगळण्यात आले. दरम्यान, आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर अनिल पाटील यांना पुन्हा एकदा मंत्रीपदाची संधी मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर ‘या’ नेत्यांच्या नावाचीही चर्चा –
संतोष देशमुख हत्याप्रकरण हे धनंजय मुंडे यांना भोवलं असून यामुळे त्यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला असल्याचे बोललं जात आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर नवीन समीकरणांची चर्चा होत आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे राजकीय पुनर्वसन होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. तर अनिल पाटील, प्रकाश सोळंके आणि संजय बनसोडे यांच्या देखील नावाची चर्चा सुरु आहे. आता राष्ट्रवादीतून नेमकी कोणत्या नेत्याला संधी मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा : ‘महाराष्ट्रात पोलिसांचा, कायद्याचा धाक राहिलेला नाही, गुंडागर्दी वाढलीये’, एकनाथ खडसेंची सरकारवर जोरदार टीका

बातमी शेअर करा !
Share
Tags: anil patil latest newsdhananjay munde resignationmarathi newsmla anil patilpolitical updatessuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pachora News: पाचोऱ्यात ‘हिरकणी कक्षाचे’ नगराध्यक्षा सुनिताताई पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

Pachora News: पाचोऱ्यात ‘हिरकणी कक्षाचे’ नगराध्यक्षा सुनिताताई पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

July 16, 2026
जळगाव एलसीबीची मोठी कारवाई! धावत्या लक्झरी बसमधील २५ लाखांची चोरी उघड; चौघांना अटक

जळगाव एलसीबीची मोठी कारवाई! धावत्या लक्झरी बसमधील २५ लाखांची चोरी उघड; चौघांना अटक

July 16, 2026
जळगावात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत एक दिवसीय उद्योजकता जागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

जळगावात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत एक दिवसीय उद्योजकता जागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

July 16, 2026
“हयातीचा दाखला सादर न केल्यास……!” केंद्र व राज्य पुरस्कृत विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रशासनाचे महत्वाचे आवाहन

“हयातीचा दाखला सादर न केल्यास……!” केंद्र व राज्य पुरस्कृत विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रशासनाचे महत्वाचे आवाहन

July 16, 2026
जळगाव जिल्ह्यात 22 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

जळगाव जिल्ह्यात 22 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

July 16, 2026
ग्रामपंचायत निवडणुकांची चाहूल?; राज्य निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर, ‘असे’ आहे संपूर्ण वेळापत्रक

ग्रामपंचायत निवडणुकांची चाहूल?; राज्य निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर, ‘असे’ आहे संपूर्ण वेळापत्रक

July 16, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page