• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

महाराष्ट्रकन्या दिव्या देशमुखचा राज्य सरकारकडून होणार गौरव; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 29, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
Maharashtra girl Divya Deshmukh will be honored by the state government; Chief Minister Devendra Fadnavis' announcement

महाराष्ट्रकन्या दिव्या देशमुखचा राज्य सरकारकडून होणार गौरव; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा

नागपूर, 29 जुलै : जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावून ‘ग्रँड मास्टर’ किताब मिळवणाऱ्या नागपूरच्या दिव्या देशमुख हिचा राज्य शासनाच्या वतीने लवकरच सन्मान केला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे पत्रकार परिषदेत दिली. नागपूर येथील रामगिरी शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

अवघ्या 19 व्या वर्षी दिव्याने अंतिम फेरीत अनुभवी कोनेरू हम्पी यांना पराभूत करत ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या स्पर्धेत दुसऱ्यांदा सहभागी होत तिने यशोशिखर गाठले असून, आतापर्यंत विविध स्पर्धांत 23 सुवर्ण पदकांसह एकूण सुमारे 35 पदके पटकावली आहेत. दिव्याच्या या ऐतिहासिक यशाचा गौरव करण्यासाठी लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल, असेही मुख्यमंत्री यांनी सांगितले.

बुद्धिबळासारख्या खेळात भारतीय महिला खेळाडूंनी घेतलेली झेप लक्षणीय आहे. दिव्या आणि कोनेरू हम्पी यांच्या चाली या तोडीस तोड होत्या आणि या दोघींनीही आपल्या खेळीने इतिहास रचला आहे. यातून भारताला आणखी एक ग्रँड मास्टर मिळाला असून तेही महाराष्ट्रातून हे विशेष अभिमानास्पद आहे.

दिव्या आणि कोनेरू यांचे हे यश देशातील उदयोन्मुख बुद्धिबळपटूंना प्रेरणा देणारे असून, भारताच्या क्रीडा लौकिकात मोलाची भर घालणारे आहे. दिव्याच्या सातत्यपूर्ण यशामागे असलेल्या तिच्या प्रशिक्षकांचे, मार्गदर्शकांचे तसेच कुटुंबीयांचे योगदानही मोठे आहे. ग्रँड मास्टर दिव्या देशमुख हिच्या या विश्वविजयी कामगिरीबद्दल मुख्यमंत्री यांनी तिला मनापासून शुभेच्छा दिल्या असून, येणाऱ्या कँडिडेट्स स्पर्धेतही दिव्या असा विजय मिळवेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच दिव्या देशमुख यांच्या या कामगिरीचा राज्य शासनाच्या वतीने सन्मान करण्यात येईल. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी चर्चा करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा : Video | “गिरीश भाऊ काही माझा वशिला लावत नव्हते; पण, निकम साहेबांनी एक फोन लावला अन्…” गुलाबराव पाटलांनी सांगितला मंत्रीपदाचा किस्सा

बातमी शेअर करा !
Share
Tags: chessdevendra fadnavisdevendra fadnavis newsdivya deshmukhfidenagpurnagpur newsramgiri

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महत्वाची बातमी! मतदार नोंदणीसाठी जिल्ह्यात 19 व 20 तसेच 26 व 27 सप्टेंबर रोजी विशेष शिबिराचे आयोजन

महत्वाची बातमी! मतदार नोंदणीसाठी जिल्ह्यात 19 व 20 तसेच 26 व 27 सप्टेंबर रोजी विशेष शिबिराचे आयोजन

September 19, 2026
संजय गांधी निराधार योजनेतील जाचक कागदपत्रांच्या अटी रद्द करण्याची मागणी; जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

संजय गांधी निराधार योजनेतील जाचक कागदपत्रांच्या अटी रद्द करण्याची मागणी; जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 19, 2026
सफाई कामगारांच्या प्रश्नांवर पाचोरा नगरपरिषदेत आढावा बैठक; महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांचे प्रशासनाला निर्देश

सफाई कामगारांच्या प्रश्नांवर पाचोरा नगरपरिषदेत आढावा बैठक; महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांचे प्रशासनाला निर्देश

September 19, 2026
शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत संस्कारक्षम पिढी घडविण्यावर भर द्यावा – मंत्री दादाजी भुसे

शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत संस्कारक्षम पिढी घडविण्यावर भर द्यावा – मंत्री दादाजी भुसे

September 19, 2026
परंपरा आणि आधुनिकतेचा समन्वय साधत सांस्कृतिक वारसा जपावा – उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन

परंपरा आणि आधुनिकतेचा समन्वय साधत सांस्कृतिक वारसा जपावा – उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन

September 19, 2026
धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे ‘सेवा संकल्प अभियानाचा उत्साहात शुभारंभ; उमेदच्या 2 हजार महिलांचा सहभाग

धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे ‘सेवा संकल्प अभियानाचा उत्साहात शुभारंभ; उमेदच्या 2 हजार महिलांचा सहभाग

September 18, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page