• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

पाचोरा तालुक्यात अतिवृष्टी; नुकसानग्रस्त भागाची पालकमंत्र्यांनी केली पाहणी, पंचनामे तात्काळ पूर्ण करण्याच्या प्रशासनाला सूचना

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 19, 2025
in पाचोरा, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
पाचोरा तालुक्यात अतिवृष्टी; नुकसानग्रस्त भागाची पालकमंत्र्यांनी केली पाहणी, पंचनामे तात्काळ पूर्ण करण्याच्या प्रशासनाला सूचना

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 18 सप्टेंबर : पाचोरा तालुक्यातील, वाडी शेवाळे, शिंदाड, सावरा पिंपरी, सातगाव डोंगरी या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे येथील शेती पिकांचे व घरांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनातर्फे लवकरच मदत उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन राज्याचे पाणीपुरवठा स्वच्छता विभाग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

पालकमंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी –

पाचोरा व जामनेर तालुक्यातील अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या गावांची पाहणी पालकमंत्र्यांनी काल केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना पालकमंत्री बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत आमदार किशोर पाटील, प्रांताधिकारी भूषण अहिरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर डी पाटील, माजी जि.प. सदस्य मधूकर काटे, रावसाहेब पाटील, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख सुनिल पाटील आदी उपस्थित होते.

तात्काळ पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश –

पालकमंत्री गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले की, या परिसरातील शेती पिकाचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले असून काही भागातील घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे घरांचे सुद्धा नुकसान झाले आहे. पुरामुळे अनेक गावात गुरे, दगावली असून पशुधनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. स्थानिक व्यापाऱ्यांच्या मालाचे व दुकानाचे सुद्धा नुकसान आहे. नुकसानग्रस्त भागात महसूल व कृषी विभागाच्या मदतीने  पंचनामे करण्याचे काम सुरू झाले असून उर्वरित भागात तात्काळ पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. दरम्यान, शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी समजून घेऊन त्यांना मदत मिळण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य संबंधित अधिकाऱ्यांनी करावे अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.


थेट शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद –

पाचोरा तालुक्यातील,शिंदाड, सार्वे बु., सातगाव या गावात अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करताना, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी थेट शेताच्या बांधावर जाऊन  शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना धीर दिला. यावेळी ते म्हणाले की, शासन पूर्णपणे आपल्या पाठीशी असून आपणास जास्तीत जास्त मदत उपलब्ध करून देण्यासाठी  मी प्रयत्न करेन,असे त्यांनी यावेळी सांगितले.

पाचोरा तालुक्यातील शिंदाड या गावात थेट बांधावर जाऊन शेतातील संपूर्ण माती व पीक वाहून गेलेल्या शेतांची पाहणी करताना ते स्वतः भावूक झाले. या पाहणी दौऱ्या दरम्यान तालुक्यातील महसूल सार्वजनिक बांधकाम आरोग्य. आदी विभागांचे अधिकारी, स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा : Video | “….तर आम्ही वर आलो नसतो!”, जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात धडक दिल्यानंतर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया

बातमी शेअर करा !
Share
Tags: minister gulabrao patilpachora floodpachora taluka newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Jamner Crime: आंतरजातीय विवाहाचा राग; मेहुण्यावर प्राणघातक हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू

Jamner Crime: आंतरजातीय विवाहाचा राग; मेहुण्यावर प्राणघातक हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू

August 2, 2026
लोकाभिमुख प्रशासन व समाजसेवा हेच महसूल विभागाचे प्रमुख ध्येय; महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी कर्मचा-यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात सपंन्न

लोकाभिमुख प्रशासन व समाजसेवा हेच महसूल विभागाचे प्रमुख ध्येय; महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी कर्मचा-यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात सपंन्न

August 2, 2026
VIDEO | अमळनेरमध्ये धाडसी बचाव कार्य; पुराच्या पाण्यात अडकलेल्या एक महिन्याच्या चिमुकल्यासह कुटुंबाची सुटका

VIDEO | अमळनेरमध्ये धाडसी बचाव कार्य; पुराच्या पाण्यात अडकलेल्या एक महिन्याच्या चिमुकल्यासह कुटुंबाची सुटका

August 1, 2026
Chalisgaon News: डेंग्यू प्रतिरोध महिन्यानिमित्त चाळीसगावात जनजागृती अभियान संपन्न

Chalisgaon News: डेंग्यू प्रतिरोध महिन्यानिमित्त चाळीसगावात जनजागृती अभियान संपन्न

August 1, 2026
शेंदुर्णी येथील श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती मार्गदर्शन सत्र संपन्न

शेंदुर्णी येथील श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती मार्गदर्शन सत्र संपन्न

July 31, 2026
VIDEO | भडगाव तालुक्यातील बात्सर येथे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बचाव कार्य; 8 जणांची सुखरूप सुटका

VIDEO | भडगाव तालुक्यातील बात्सर येथे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बचाव कार्य; 8 जणांची सुखरूप सुटका

July 31, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page