• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

माहितीचा अधिकार अर्जाद्वारे  माहिती उपलब्ध करून घेण्यासाठी अर्ज परिपूर्ण भरणे आवश्यक – राज्य माहिती आयुक्त भूपेंद्र गुरव

माहितीचा अधिकार अधिनियम 2005 या विषयावरील चर्चासत्र संपन्न

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 9, 2025
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
माहितीचा अधिकार अर्जाद्वारे  माहिती उपलब्ध करून घेण्यासाठी अर्ज परिपूर्ण भरणे आवश्यक – राज्य माहिती आयुक्त भूपेंद्र गुरव

जळगाव, 9 ऑक्टोबर : माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत कोणत्याही कार्यालयाकडून माहिती मागवीत असताना, आपल्याला ज्या विषयाची माहिती आवश्यक आहे तो विषय अर्जात व्यवस्थितपणे लिहिणे,  विषयानुसार कोणत्या कालावधीतील माहिती पाहिजे आहे. आदी बाबींचा अर्जात उल्लेख करून जन माहिती अधिकारी यांच्याकडे अर्ज परिपूर्ण भरून सादर करणे आवश्यक असते. अशी माहिती, राज्य माहिती आयोग नाशिक खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त भूपेंद्र गुरव यांनी दिली.

‘माहिती अधिकार कायदा 2005’ या विषयावर  जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी उपस्थित त्यांना मार्गदर्शन करताना गुरव बोलत होते. यावेळी राज्य माहिती आयोग नाशिक खंडपीठाचे उपसचिव चंद्रकांत कातकाडे, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आर. एस. लोखंडे, उपजिल्हाधिकारी निवडणुक अर्चना मोरे, भुसंपादन अधिकारी निवृत्ती गायकवाड, आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्य माहिती आयुक्त गुरव पुढे म्हणाले की, माहितीचा अधिकार कायदा अंमलात येऊन वीस वर्षे पूर्ण होत आहे. माहितीचा अधिकार हा कायद्याने नियंत्रित केलेला असून भारताच्या प्रत्येक नागरिकाला माहिती मागण्याचा अधिकार उपलब्ध आहे. कोणत्याही पदावर असलेल्या व्यक्तीला माहिती मागता येत नसून फक्त व्यक्ती म्हणून माहिती मागता येते. कलम सहा अन्वये माहिती मागताना फक्त विनंती करता येते.


माहिती अधिकाराचा अर्ज करताना, नमुना अर्जातील सर्व मुद्द्यांची माहिती अर्जदार भरणे आवश्यक असून अर्जाच्या बंद लिफाफ्यावर माहितीचा अधिकार अर्ज असे नमूद केले गेले पाहिजे. तसेच जन माहिती अधिकारी यांच्याकडे आपला अर्ज पोहोचला आहे का याची खात्री अर्जदाराने करणे आवश्यक आहे.

प्रथम अपील अर्ज करताना, अर्जामध्ये माहितीचे कारण लिहिणे आवश्यक आहे. प्रपत्र ‘क’ नुसार आयोगाकडे द्वितीय अपील करतांना काय काळजी  घेतली पाहिजे, जनमाहिती अधिकारी आणि प्रथम अपीलीय अधिकारी यांनी माहिती अधिकार अर्ज हाताळतांना काय काळजी घ्यावी, अर्ज कसा करावा याबाबत त्यांनी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. माहितीचा अधिकार कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी जनमाहिती अधिकारी व प्रथम अपीलिय अधिकारी यांच्यात समन्वय आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

यावेळी गुरव यांनी माहिती अधिकारासंबधी माहिती अधिकाराचा अर्ज करतांना काय काळजी घ्यावी या विषयावर मार्गदर्शन केले. चर्चासत्राच्या शेवटी जनमाहिती अधिकारी व माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्या विविध प्रश्नाचे निरसण त्यांनी केले. या चर्चासत्राला शासनाच्या विविध विभागाचे जनमाहिती अधिकारी, प्रथम अपीलीय अधिकारी, माहिती अधिकार कार्यकर्ते,  समान्य नागरीक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी भुसंपादन अधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी आभार व्यक्त केले.

हेही वाचा : Breaking! जळगाव जिल्हाधिकारी पदाचा रोहन घुगे यांनी स्वीकारला पदभार

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon newsRight to Information Act 2005State Information Commissioner Bhupendra Guravsuvarna khandesh live news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

May 31, 2026
IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

May 31, 2026
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

May 30, 2026
मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

May 30, 2026
Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

May 30, 2026
भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

May 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page