• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

Bhadgaon News : भडगावमध्ये शाळेतील दोन चिमुकल्यांचा नाल्यात बुडून मृत्यू; पाच जणांना अटक

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 16, 2025
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, भडगाव
Bhadgaon News : भडगावमध्ये शाळेतील दोन चिमुकल्यांचा नाल्यात बुडून मृत्यू; पाच जणांना अटक

भडगाव, 16 डिसेंबर : जळगाव जिल्ह्यातील भडगाव शहरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नर्सरीत शिकणाऱ्या चार वर्षांच्या दोन मुलांचा नाल्यात पडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी सुमारे 11 वाजता समोर आली. अंश सागर तहसीलदार (वय 4, रा. आदर्श कॉलनी) आणि मयंक उर्फ संकेत ज्ञानेश्वर वाघ (वय 4, रा. बालाजी गल्ली) अशी मृत मुलांची नावे आहेत.

दोघेही भडगावातील आदर्श कन्या इंग्रजी माध्यम शाळेत नर्सरीत शिकत होते. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून संस्थाचालकासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुशिल सोनवणे पुढील तपास करत आहेत.

नेमकं काय घडलं? –

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शाळेच्या परिसरात खेळत असताना हे दोन्ही चिमुकले संरक्षक भिंतीजवळ गेले. खेळता-खेळता त्यांचा तोल गेला आणि ते थेट शेजारील नाल्यात पडले. नाल्यातील पाण्यात बुडाल्याने त्या दोघांचा मृत्यू झाला. ही घटना लगेच कोणाच्या लक्षात आली नाही. मात्र, काही वेळानंतर शोध घेतल्यानंतर नाल्यात दोघांचे मृतदेह आढळून आले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. पालकांनीही शाळेकडे धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन दोन्ही मुलांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी संस्थाचालकासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुशिल सोनवणे पुढील तपास करत आहेत.

शाळेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह –

या दुर्दैवी घटनेनंतर शाळेच्या हलगर्जीपणाबाबत पालकांसह नागरिकांमध्ये संतापाची भावना पसरली आहे. शाळेच्या संरक्षण भिंतीजवळ पुरेशी सुरक्षा नसल्यानेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप केला जात आहे. शाळेची सुरक्षा व्यवस्था अपुरी असल्याचा सवाल उपस्थित करण्यात येत असून या प्रकरणात जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.


हेही वाचा : Breaking! नवीन वीज मीटरसाठी वायरमनने घेतली 2 हजार रूपयांची लाच; जळगावात एसीबीने केली मोठी कारवाई, नेमकं प्रकरण काय?

बातमी शेअर करा !
Share
Tags: bhadgaon newschildren diedlatest updatesmarathi latest newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आमदार अमोल जावळे यांच्या वाढदिवसानिमित्त अडावद येथे वृक्षारोपण व गोसेवेचा उपक्रम

आमदार अमोल जावळे यांच्या वाढदिवसानिमित्त अडावद येथे वृक्षारोपण व गोसेवेचा उपक्रम

June 20, 2026
पिंप्री खु. येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या नव्या शाखेचे उद्घाटन

पिंप्री खु. येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या नव्या शाखेचे उद्घाटन

June 20, 2026
अवैध धंद्यांविरोधात महिलांनी निर्भयपणे पुढे यावे : एपीआय कल्याणी वर्मा

अवैध धंद्यांविरोधात महिलांनी निर्भयपणे पुढे यावे : एपीआय कल्याणी वर्मा

June 20, 2026
ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी संसदीय संकुल विकास परियोजनेचा विस्तार वाढवणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी संसदीय संकुल विकास परियोजनेचा विस्तार वाढवणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 20, 2026
VIDEO | मुक्ताईनगरातील ‘ड्रॉप केस’ टोळ्यांविरोधात जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; पहाटेच्या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये शस्त्रे, रोख रक्कम, दागिने, वाहने जप्त

VIDEO | मुक्ताईनगरातील ‘ड्रॉप केस’ टोळ्यांविरोधात जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; पहाटेच्या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये शस्त्रे, रोख रक्कम, दागिने, वाहने जप्त

June 19, 2026
मोठी बातमी! २४ जूनपासून मान्सून पुन्हा सक्रिय होणार; हवामान विभागाचा अंदाज

मोठी बातमी! २४ जूनपासून मान्सून पुन्हा सक्रिय होणार; हवामान विभागाचा अंदाज

June 19, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page