• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home धुळे

पोलीस पाटील ग्रामीण भागातील पोलीस यंत्रणेचा कणा; त्यांनी आपले कर्तव्य चोखपणे बजावावे –पालकमंत्री जयकुमार रावल

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 27, 2026
in धुळे, खान्देश, ताज्या बातम्या
पोलीस पाटील ग्रामीण भागातील पोलीस यंत्रणेचा कणा; त्यांनी आपले कर्तव्य चोखपणे बजावावे –पालकमंत्री जयकुमार रावल

धुळे, 27 जानेवारी : पोलीस पाटील ग्रामीण भागातील पोलीस यंत्रणेचा कणा असून कायदा व सुव्यवस्था राखण्यात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे पोलीस पाटलांनी आपले कर्तव्य चोखपणे बजावावे, असे प्रतिपादन पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.

पोलीस विभागामार्फत आयोजित जिल्हास्तरीय पोलीस पाटील मेळावा व ‘पोलीस पाटील मार्गदर्शिका’ पुस्तकाचे अनावरण कार्यक्रम आज हिरे भवन येथे झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार अनुप अग्रवाल, राघवेंद्र पाटील, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर जाधव आदी उपस्थित होते.

पालकमंत्री जयकुमार रावल म्हणाले की, एखादी घटना घडल्यानंतर माहिती देण्यापेक्षा घटना घडूच नये यासाठी प्रतिबंधात्मक भूमिका बजावण्याची क्षमता पोलीस पाटलांकडे आहे. समाजात पोलीस पाटलांकडे प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व म्हणून पाहिले जाते. अलीकडच्या काळात सुशिक्षित महिला व पुरुष, पदवीधर तसेच पदव्युत्तर शिक्षण घेतलेले नागरिक पोलीस पाटील म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कामकाजाला योग्य दिशा व स्पष्टता मिळावी मार्गदर्शिका उपयुक्त ठरेल.

ब्रिटिशकालीन कायदे लोकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तयार करण्यात आले होते. हे कायदे रद्द करून भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 आणि भारतीय साक्ष अधिनियम लागू करण्यात आले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली हे ऐतिहासिक कायदे अस्तित्वात आले असून, त्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यामध्ये पोलीस पाटलांची भूमिका महत्त्वाची आहे, असे त्यांनी नमूद केले. गावातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, सतर्क राहणे, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आणि शांतता प्रस्थापित करणे ही जबाबदारी पोलीस पाटलांनी पार पाडावी.

आमदार राघवेंद्र पाटील म्हणाले की, ग्रामीण भागातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सरपंच, ग्रामसेवक व रोजगार सेवकांबरोबरच पोलीस पाटील हा अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. आमदार अनुप अग्रवाल म्हणाले की, ग्रामीण भागात पोलीस पाटील व्यवस्था प्रभावी आहे. पोलीस पाटील हे पोलीस विभागाचे स्लिपरसेल म्हणून काम करतात. माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी मनोगत व्यक्त केले.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे म्हणाले की, पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या सूचनेनुसार जिल्हास्तरीय पोलीस पाटील मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलीस पाटलांचा गौरव व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. मार्गदर्शिकेमध्ये दैनंदिन कामकाजास उपयुक्त सूचना, अधिनियम व शासकीय सूचना व अधिनियमाचा समावेश असून, या पुस्तिकेमुळे पोलीस पाटलांना त्यांच्या अधिकार व कर्तव्यांची  जाणीव होईल.

यावेळी कायदा व सुव्यवस्थेबाबत तत्काळ माहिती पोलीस दलाला पुरविणाऱ्या पोलीस पाटलांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.तसेच पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक पोलीस निरीक्षक रुपेश काळे यांनी केले, तर अपर पोलीस अधीक्षक डॉ. देवरे यांनी आभार मानले. मेळाव्यास जिल्हाभरातील पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)

हेही वाचा : 150 दिवसांच्या ‘ई-गव्हर्नन्स’ कार्यक्रमात राज्यात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाचा प्रथम क्रमांक

बातमी शेअर करा !
Share
Tags: dhule newsjaykumar rawalmarathi newspolice patil melavasuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

देशनिहाय स्किल पासपोर्ट, अद्ययावत प्रशिक्षण आणि सुरक्षित भरती प्रक्रियेवर राज्य शासनाचा भर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

देशनिहाय स्किल पासपोर्ट, अद्ययावत प्रशिक्षण आणि सुरक्षित भरती प्रक्रियेवर राज्य शासनाचा भर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 22, 2026
जळगाव जिल्ह्यात ‘स्पेलिंग बी’ उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या इंग्रजी सक्षमीकरणाला नवी दिशा; जिल्हास्तरीय स्पर्धेत चार गटांतील 120 विद्यार्थी सहभागी होणार

जळगाव जिल्ह्यात ‘स्पेलिंग बी’ उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या इंग्रजी सक्षमीकरणाला नवी दिशा; जिल्हास्तरीय स्पर्धेत चार गटांतील 120 विद्यार्थी सहभागी होणार

September 21, 2026
जळगावात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई! महसूल सहायकासह खासगी वकील 25 हजारांची लाच घेताना जाळ्यात

जळगावात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई! महसूल सहायकासह खासगी वकील 25 हजारांची लाच घेताना जाळ्यात

September 21, 2026
जळगाव पोलीस दलाच्या दिमतीला 12 नव्या ‘बोलेरो निओ’; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

जळगाव पोलीस दलाच्या दिमतीला 12 नव्या ‘बोलेरो निओ’; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

September 21, 2026
‘जळगाव जिल्ह्यात चोरीच्या घटना वाढल्या’; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पोलीस व महावितरण प्रशासनाला दिल्या महत्वाच्या सूचना

‘जळगाव जिल्ह्यात चोरीच्या घटना वाढल्या’; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पोलीस व महावितरण प्रशासनाला दिल्या महत्वाच्या सूचना

September 21, 2026
भडगाव तालुक्यातील अंतुर्ली बुवाची शिवारात बिबट्याचा वावर; गायच्या वासरावर हल्ला, वनविभागाच्या पथकाची घटनास्थळी भेट

भडगाव तालुक्यातील अंतुर्ली बुवाची शिवारात बिबट्याचा वावर; गायच्या वासरावर हल्ला, वनविभागाच्या पथकाची घटनास्थळी भेट

September 21, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page