• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

उपनिबंधकासह खासगी इसम Anti Corruption पथकाच्या जाळ्यात; दीड लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले, नेमकं प्रकरण काय?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 20, 2026
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
उपनिबंधकासह खासगी इसम Anti Corruption पथकाच्या जाळ्यात; दीड लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले, नेमकं प्रकरण काय?

जळगाव, 20 मे: अवैध सावकारी प्रकरणातील चौकशी अहवाल अनुकूल पाठविण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी जळगाव येथील उप निबंधक सह संस्था कार्यालयातील उप निबंधक जगदीश बाबुराव बारी यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई केली आहे. तडजोडीनंतर तीन लाख रुपयांवर व्यवहार ठरल्यानंतर त्यातील पहिला हप्ता म्हणून दीड लाख रुपये खासगी इसमामार्फत स्वीकारताना सापळा रचून आरोपींना रंगेहात पकडण्यात आले आहे.

या प्रकरणातील आरोपी जगदीश बाबुराव बारी (वय ५६, रा. शांतीनगर, यावल रोड, भुसावळ) हे उप निबंधक, सह संस्था, जळगाव येथे कार्यरत आहेत. तर देविदास धनसिंग पाटील (वय ४४, रा. भुरे मामलेदार प्लॉट, शिवाजीनगर, जळगाव) हे जळगाव जिल्हा बँक असोसिएशनचे मानद कार्यकारी अधिकारी असून त्यांनाही या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय? –

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराविरुद्ध अवैध सावकारी व्यवसायासंदर्भात कारवाई सुरू होती. या प्रकरणाची सुनावणी उप निबंधक सहकारी संस्था, जळगाव तालुका कार्यालयात सुरू होती. चौकशीसंदर्भात माहिती घेण्यासाठी तक्रारदार संबंधित कार्यालयात गेले असता, त्यांच्याविरुद्ध व त्यांच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल होऊ नये तसेच चौकशी अहवाल अनुकूल पाठविण्यासाठी उप निबंधक जगदीश बारी यांनी पाच लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.

याबाबत तक्रारदारांनी १८ मे रोजी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली. या पडताळणीदरम्यान आरोपी बारी यांनी पाच लाख रुपयांच्या मागणीवरून तडजोड करत तीन लाख रुपये स्वीकारण्यास तयारी दर्शवली. तसेच पहिला हप्ता म्हणून दीड लाख रुपये २० मे रोजी देविदास पाटील यांच्याकडे देण्यास सांगितले.

….अन् दीड लाख रुपयांची रक्कम स्वीकारताच एसीबीने पकडले रंगेहात –

यानंतर बुधवारी एसीबीच्या पथकाने सापळा रचला. जळगाव जिल्हा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स असोसिएशन लिमिटेड, बी. जे. मार्केट, जळगाव येथील कार्यालयात देविदास पाटील यांनी तक्रारदाराकडून दीड लाख रुपयांची रक्कम स्वीकारताच पथकाने त्यांना रंगेहात पकडले.

यांनी केली कारवाई –

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रेश्मा अवतारे यांच्यासह पोलिस निरीक्षक हेमंत नागरे, बाळू मराठे, संगीता पवार, मनोज पाटील आणि सचिन चाटे यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक स्मिता नवघरे करीत आहेत. दरम्यान, भ्रष्टाचारसंबंधी काही माहिती असल्यास अथवा लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल काही तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकुर यांनी केले आहे.

हेही वाचा: तुकाराम मुंढेंची अवघ्या दीड महिन्यात पुन्हा बदली, ‘या’ विभागाचा आयुक्तपदाचा पदभार तात्काळ स्वीकारण्याचे आदेश

बातमी शेअर करा !
Share
Tags: anti-corruption bureau jalgaonbribe casejalgaon newssub-registrarsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बऱ्हाणपूर–अंकलेश्वर महामार्ग प्रकल्प; रावेर, यावल, फैजपूर व सावदा शहरांतील मुख्य रस्त्यांचे होणार काँक्रीटीकरण

बऱ्हाणपूर–अंकलेश्वर महामार्ग प्रकल्प; रावेर, यावल, फैजपूर व सावदा शहरांतील मुख्य रस्त्यांचे होणार काँक्रीटीकरण

July 6, 2026
राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या जामनेर तालुका अध्यक्षपदी हजराताई गनी तडवी यांची निवड

राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या जामनेर तालुका अध्यक्षपदी हजराताई गनी तडवी यांची निवड

July 6, 2026
राज्यात मुसळधार पावसाचा कहर; विविध दुर्घटनांत 9 जणांचा मृत्यू, अनेक भागांत जनजीवन विस्कळीत

राज्यात मुसळधार पावसाचा कहर; विविध दुर्घटनांत 9 जणांचा मृत्यू, अनेक भागांत जनजीवन विस्कळीत

July 6, 2026
पावसाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा 24 बाय 7 ‘अलर्ट मोड’वर ठेवा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पावसाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा 24 बाय 7 ‘अलर्ट मोड’वर ठेवा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 6, 2026
माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची जयंती ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरी करणार; राज्यभर जलपूजन व विविध उपक्रम

माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची जयंती ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरी करणार; राज्यभर जलपूजन व विविध उपक्रम

July 5, 2026
गाय-वासरासह विठुरायाच्या दर्शनासाठी सातगाव डोंगरीची ‘निर्लोभ पायी दिंडी’ रवाना

गाय-वासरासह विठुरायाच्या दर्शनासाठी सातगाव डोंगरीची ‘निर्लोभ पायी दिंडी’ रवाना

July 5, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page