• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, जळगाव जिल्ह्यात कुठे रिमझिम तर कुठे मुसळधार; जाणून घ्या सविस्तर हवामान अंदाज

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 4, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, जळगाव जिल्ह्यात कुठे रिमझिम तर कुठे मुसळधार; जाणून घ्या सविस्तर हवामान अंदाज

जळगाव, 4 जुलै: राज्यात गेल्या तीन दिवसांपासून अनेक जिल्ह्यांत जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबईतही मुसळधार पाऊस कोसळत असून 4 ते 6 जुलैदरम्यान मुंबईसह रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याशिवाय, मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाट भागातही या कालावधीत मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट –

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, नाशिक, रायगड तसेच पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील काही भागांमध्ये अतिमुसळधार ते अतिवृष्टीसदृश पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने संबंधित जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला असून नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग, तर उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे आणि विदर्भातील वाशिम, यवतमाळ, गोंदिया या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीने स्थानिक प्रशासनाच्या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने म्हटले आहे.

जळगाव जिल्ह्याचा हवामान अंदाज –

जळगाव जिल्ह्यातही गेल्या दोन दिवसांपासून पावसाची हजेरी कायम असून काही तालुक्यांमध्ये रिमझिम, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून शेतकऱ्यांनाही काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, जिल्ह्यात पावसाचा जोर ठिकठिकाणी वेगवेगळा असून काही भागांत रिमझिम, तर काही भागांत मुसळधार होताना दिसून येत आहे.

दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार जळगाव जिल्ह्यात ४, ५ आणि ६ जुलै रोजी अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत पावसाच्या किंवा मेघगर्जनेसह पावसाच्या एक-दोन सरी पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून नागरिकांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा: संत सखाराम महाराज संस्थानाच्या पुनर्बांधणीसाठी सर्वतोपरी मदत; मंदिराला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

बातमी शेअर करा !
Share
Tags: daily rain updatejalgaon district weather updatemarathi newsred alertsuvarna khandesh liveweather update

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्यातील शिवाजी नगर भागातील ‘चांदसी दवाखाना’ सील; बोगस डॉक्टरवर कारवाई

पाचोऱ्यातील शिवाजी नगर भागातील ‘चांदसी दवाखाना’ सील; बोगस डॉक्टरवर कारवाई

August 18, 2026
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून अवयव प्रत्यारोपणासाठी 798 रुग्णांना 15.79 कोटींची मदत

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून अवयव प्रत्यारोपणासाठी 798 रुग्णांना 15.79 कोटींची मदत

August 18, 2026
ग्रामसभेतील गदारोळानंतर ग्रामसेवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; पारोळा तालुक्यातील शिवरे येथील घटना

ग्रामसभेतील गदारोळानंतर ग्रामसेवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; पारोळा तालुक्यातील शिवरे येथील घटना

August 18, 2026
VIDEO | “दर्शन घेतानाच मला कानामध्ये…..!” नाशिकचे पालकमंत्री झाल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया

VIDEO | “दर्शन घेतानाच मला कानामध्ये…..!” नाशिकचे पालकमंत्री झाल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया

August 17, 2026
राज्यात 1 हजार 440 डॉक्टरांची लवकरच नियुक्ती; सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती

राज्यात 1 हजार 440 डॉक्टरांची लवकरच नियुक्ती; सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती

August 17, 2026
धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत मोहमांडली येथे सर्वसमावेशक आरोग्य सेवा

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत मोहमांडली येथे सर्वसमावेशक आरोग्य सेवा

August 16, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page