• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

अभूतपुर्व पावसाची स्थिती; नाशिक जिल्ह्याला आज सर्वाधिक मोठा अलर्ट, जळगाव जिल्ह्याचे हवामान कसे असेल?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 7, 2026
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
अभूतपुर्व पावसाची स्थिती; नाशिक जिल्ह्याला आज सर्वाधिक मोठा अलर्ट, जळगाव जिल्ह्याचे हवामान कसे असेल?

जळगाव, 7 जुलै: महाराष्ट्रभर मान्सूनने सध्या रौद्ररूप धारण केले असून राज्यातील बहुतांश भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा कहर सुरू आहे. गेल्या तीन दिवसांपासून विविध जिल्ह्यांत सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला असून प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज –

भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. सातारा जिल्ह्यातील घाटमाथा आणि दुर्गम भागात ७ जुलै रोजी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाबळेश्वर, पाटण, वाई, सातारा आणि जावळी या तालुक्यांत गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून डोंगराळ भागातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे.

कोकणातही पावसाचा जोर कायम आहे. पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून येथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच ठाणे, मुंबई आणि रत्नागिरी येथेही जोरदार पावसाचा अंदाज असून या भागांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे घाटमाथा परिसरातही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, नांदेड, हिंगोली, लातूर, जालना आणि धाराशिव जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय, विदर्भातील अकोला आणि अमरावती जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून या दोन्ही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

नाशिक जिल्ह्याला आज सर्वाधिक मोठा अलर्ट –

राज्यात पावसाचा जोर कायम असून नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि आसपासच्या भागात संततधार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने आज (7 जुलै) नाशिक जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करत पुढील काही तासांत ढगफुटीसदृश पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी मध्यरात्रीच त्र्यंबकेश्वर येथील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला.

जळगाव जिल्ह्याचा हवामान अंदाज काय? –

जळगाव जिल्ह्यात बहुतांश भागात समाधानकारक पाऊस झाल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर शेतीकामांना वेग आला आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात मंगळवारी (7 जुलै) अंशतः ढगाळ वातावरण राहून मध्यम स्वरूपाच्या पावसासह मेघगर्जनेची शक्यता आहे. तसेच ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट तसेच मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा: पावसाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा 24 बाय 7 ‘अलर्ट मोड’वर ठेवा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बातमी शेअर करा !
Share
Tags: imdjalgaon district weather updatemaharastra rainfallmarathi newsrain alertrainfallsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी आरोग्य जनजागृती शिबिर; डेंग्यू, हिवतापासह जलजन्य आजार, कुष्ठरोग व एचआयव्ही-एड्सबाबत मार्गदर्शन

चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी आरोग्य जनजागृती शिबिर; डेंग्यू, हिवतापासह जलजन्य आजार, कुष्ठरोग व एचआयव्ही-एड्सबाबत मार्गदर्शन

August 22, 2026
तारखेडा रेल्वे गेट व शेतकरी रस्ता बंद; खासदार स्मिता वाघ यांची पाहणी, पर्यायी व्यवस्था करण्याच्या रेल्वे प्रशासनाला सूचना

तारखेडा रेल्वे गेट व शेतकरी रस्ता बंद; खासदार स्मिता वाघ यांची पाहणी, पर्यायी व्यवस्था करण्याच्या रेल्वे प्रशासनाला सूचना

August 22, 2026
व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

August 22, 2026
‘ग्रामसभा कमी नको, अधिक सक्षम करा;’ ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या मागणीला हरकत

‘ग्रामसभा कमी नको, अधिक सक्षम करा;’ ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या मागणीला हरकत

August 22, 2026
पेलेट गन हल्ला प्रकरण; राहुल गांधींचे दिल्लीत आंदोलन अन् अखेर दिल्ली पोलिसांकडून एफआयआर दाखल करण्याची तयारी

पेलेट गन हल्ला प्रकरण; राहुल गांधींचे दिल्लीत आंदोलन अन् अखेर दिल्ली पोलिसांकडून एफआयआर दाखल करण्याची तयारी

August 21, 2026
उद्योजकांनी स्थानिक युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी देऊन विकासाला गती द्यावी — पालकमंत्री गुलाबराव पाटील

उद्योजकांनी स्थानिक युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी देऊन विकासाला गती द्यावी — पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 21, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page