• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल यांची जळगाव जिल्ह्यातील शाळांना भेट

विद्यार्थीकेंद्रित उपक्रम, गुणवत्तापूर्ण शिक्षण व मूलभूत सुविधांवर भर

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 7, 2026
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल यांची जळगाव जिल्ह्यातील शाळांना भेट

जळगाव, 7 ऑगस्ट: राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल यांनी आज जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषद तसेच खासगी शाळांना भेट देऊन शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधा, शाळांमध्ये राबविण्यात येणारे विविध उपक्रम आणि शैक्षणिक वातावरणाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी आवश्यक त्या ठिकाणी सुधारणा करण्याबाबत सूचना देत विद्यार्थीकेंद्रित शिक्षणाला अधिक बळ देण्यावर भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

या पाहणी दौऱ्यात उपायुक्त तुषार महाजन, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, प्राथमिक शिक्षणाधिकारी निलेश पाटील, उपशिक्षणाधिकारी नरेंद्र चौधरी, विजय सरोदे यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.

प्रधान सचिव रणजीतसिंह देओल यांनी यावल तालुक्यातील साकळी येथील जिल्हा परिषद उर्दू शाळा, जिल्हा परिषद मराठी शाळा तसेच शारदा हायस्कूल येथे भेट देऊन वर्गखोल्या, अध्ययन-अध्यापन प्रक्रिया, विद्यार्थ्यांची उपस्थिती, शैक्षणिक साहित्य, स्वच्छता, डिजिटल सुविधा आणि शाळेतील एकूण वातावरणाची पाहणी केली. विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अध्ययनातील आवडी-निवडी, शैक्षणिक प्रगती, शालेय उपक्रम तसेच उपलब्ध सुविधांविषयी माहिती घेतली.

त्यानंतर त्यांनी पाळधी येथील जिल्हा परिषद शाळा, कन्या शाळा तसेच ए. टी. झांबरे विद्यालयाला भेट देऊन विविध शैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेतला. मुख्याध्यापक व शिक्षकांशी चर्चा करताना विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, गुणवत्तापूर्ण शिक्षण, नियमित उपस्थिती, वाचन संस्कृती, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रम यांना अधिक चालना देण्याबाबत सूचना केल्या.

शाळांमध्ये मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रत्येक विद्यार्थ्याला आनंददायी, गुणवत्तापूर्ण आणि प्रेरणादायी शिक्षण मिळावे, यासाठी स्थानिक पातळीवर प्रभावी नियोजन करून विविध शैक्षणिक अभियानांची अंमलबजावणी करण्यावर त्यांनी भर दिला.

यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी निलेश पाटील व माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांच्यासोबत जिल्ह्यातील शैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. शाळांमध्ये गुणवत्ता वृद्धीसाठी, विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी तसेच नवोपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी नवीन अभियान राबविण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

दौऱ्यादरम्यान शाळांतील शिक्षकांनी राबविलेल्या विविध उपक्रमांचे प्रधान सचिवांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देत शिक्षणाची गुणवत्ता सातत्याने उंचावण्यासाठी प्रशासन, शिक्षक आणि पालक यांनी समन्वयाने कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

हेही वाचा: नशामुक्त युवा विकसित भारत अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी समन्वयाने काम करावे – केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon district latest newsPrincipal Secretary of School Education DepartmentRanjit Singh Deolsuvarna khandesh live news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात स्व. हरिभाऊ जावळे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन व अभिवादन

जळगावात स्व. हरिभाऊ जावळे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन व अभिवादन

October 3, 2026
पाचोरा-भडगावच्या विविध प्रश्नांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी आढावा बैठक

पाचोरा-भडगावच्या विविध प्रश्नांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी आढावा बैठक

October 3, 2026
SIRची पडताळणी सुरू; Unmapped व विसंगती असलेल्या मतदारांच्या घरी BLO-AERO पथक जाणार, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नागरिकांना केले महत्वाचे आवाहन

SIRची पडताळणी सुरू; Unmapped व विसंगती असलेल्या मतदारांच्या घरी BLO-AERO पथक जाणार, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नागरिकांना केले महत्वाचे आवाहन

October 3, 2026
दिवेआगर दुर्घटना प्रकरण; आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रशासनाला महत्वाच्या सूचना

दिवेआगर दुर्घटना प्रकरण; आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रशासनाला महत्वाच्या सूचना

October 2, 2026
आदिवासी योजनांच्या सामाजिक परिणामांच्या विश्लेषण अहवालाचे आदिवासी विकास मंत्री यांच्या हस्ते प्रकाशन

आदिवासी योजनांच्या सामाजिक परिणामांच्या विश्लेषण अहवालाचे आदिवासी विकास मंत्री यांच्या हस्ते प्रकाशन

October 2, 2026
पाचोरा तालुक्यातील सारोळा खुर्द ग्रामपंचायतीच्या विकासकामांची चौकशी होणार; प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर उपोषण मागे

पाचोरा तालुक्यातील सारोळा खुर्द ग्रामपंचायतीच्या विकासकामांची चौकशी होणार; प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर उपोषण मागे

October 2, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page