• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत मोहमांडली येथे सर्वसमावेशक आरोग्य सेवा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 16, 2026
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, यावल, रावेर
धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत मोहमांडली येथे सर्वसमावेशक आरोग्य सेवा

जळगाव, 16 ऑगस्ट: केंद्र शासनाच्या आदिवासी कार्य मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली व आदिवासी विकास विभागाच्या समन्वयातून ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’ अंतर्गत सातपुडा पर्वतरांगांतील अतिदुर्गम मोहमांडली गावात सर्वसमावेशक आरोग्य तपासणी व आरोग्यसेवा उपक्रम राबविण्यात आला.

जिल्हाधिकारी रोहन घुगे व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांच्या समन्वयाने हा उपक्रम राबविण्यात आला.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अमोल भंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. दीपल पाटील व डॉ. सलमान पटेल यांच्या देखरेखीखाली आरोग्य विभागाच्या पथकाने हा उपक्रम यशस्वीपणे राबविला. डॉ. रमीज सय्यद, मुबारक तडवी, वैशाली तळेले तसेच आशा कार्यकर्तींनी उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीत विशेष योगदान दिले.

‘आरोग्यदायी आदिवासी समाज–सशक्त आदिवासी समाज’ या संकल्पनेतून नागरिकांची BP, BSL, NCD अंतर्गत आवश्यक आरोग्य तपासणी करण्यात आली. मुली, गरोदर माता आणि ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची विशेष तपासणी करून त्यांना आवश्यक उपचार व आरोग्यविषयक मार्गदर्शन देण्यात आले.

दुर्गम भागात सुरक्षित प्रसूती –

या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे मोहमांडली येथील उपकेंद्रात एका आदिवासी महिलेची सुरक्षित व सुखरूप प्रसूती करण्यात आली. माता व नवजात बाळाच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत दुर्गम भागात वेळेवर प्रसूती सेवा उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे आरोग्यसेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याच्या अभियानाच्या उद्दिष्टाला प्रत्यक्ष कृतीची जोड मिळाली.

दुर्गम आदिवासी भागातील शेवटच्या नागरिकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेला हा उपक्रम ‘कोणीही आरोग्यसेवेपासून वंचित राहू नये’ या संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी ठरला आहे. ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’ हे आदिवासी समाजाच्या आरोग्य, सुरक्षितता आणि सर्वांगीण विकासासाठी एक दृढ पाऊल असल्याचे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

हेही वाचा: जनसहभागातून जळगावच्या सर्वांगीण विकासाला गती; लोककल्याणकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यावर भर

बातमी शेअर करा !
Share
Tags: dharti aaba janjatiya gram utkarsh abhiyanitdp yawaljalgaon district newsmarathi newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ज्येष्ठ नागरिक ही देशाची संपत्ती!’; समाज कल्याण विभागाच्या वतीने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात संपन्न

‘ज्येष्ठ नागरिक ही देशाची संपत्ती!’; समाज कल्याण विभागाच्या वतीने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात संपन्न

October 2, 2026
दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उद्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर

दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उद्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर

October 2, 2026
मोठी बातमी! जि.प. शाळा आणि अंगणवाड्यांचा कायापालट होणार; ग्रामपंचायतींच्या ‘जनसुविधा’ निधीतून मिळणार लाखो रुपयांचा निधी

मोठी बातमी! जि.प. शाळा आणि अंगणवाड्यांचा कायापालट होणार; ग्रामपंचायतींच्या ‘जनसुविधा’ निधीतून मिळणार लाखो रुपयांचा निधी

October 1, 2026
पाचोऱ्यातील पिंपळगाव बुद्रुक येथे सेवा संकल्प अभियानातून 222 लाभार्थ्यांना विविध शासकीय सेवांचा लाभ

पाचोऱ्यातील पिंपळगाव बुद्रुक येथे सेवा संकल्प अभियानातून 222 लाभार्थ्यांना विविध शासकीय सेवांचा लाभ

October 1, 2026
चार भंगार व्यावसायिकांविरुद्ध गुन्हे दाखल; 75 हजारांचा कॉपर-ॲल्युमिनियम तारसाठा जप्त, पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची कारवाई

चार भंगार व्यावसायिकांविरुद्ध गुन्हे दाखल; 75 हजारांचा कॉपर-ॲल्युमिनियम तारसाठा जप्त, पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची कारवाई

October 1, 2026
नवरात्रीत होणार ‘जागर आरोग्याचा’! ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ उपक्रमातून साधणार आरोग्य विषयी तरुणांशी संवाद

नवरात्रीत होणार ‘जागर आरोग्याचा’! ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ उपक्रमातून साधणार आरोग्य विषयी तरुणांशी संवाद

October 1, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page