• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

नवरात्रीत होणार ‘जागर आरोग्याचा’! ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ उपक्रमातून साधणार आरोग्य विषयी तरुणांशी संवाद

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 1, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
नवरात्रीत होणार ‘जागर आरोग्याचा’! ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ उपक्रमातून साधणार आरोग्य विषयी तरुणांशी संवाद

मुंबई, 1 ऑक्टोबर: नवरात्रोत्सवात राज्यातील महाविद्यालयीन तरुणाईच्या आरोग्याचा जागर केला जाणार आहे. वाढता स्क्रीन टाइम, अपुरी झोप, चुकीच्या आहाराच्या सवयी, व्यायामाचा अभाव आणि मानसिक ताण यामुळे तरुणांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. या पार्श्वभूमीवर आजार टाळण्यासाठी तरुण वयापासूनच आरोग्यदायी जीवनशैलीबाबत जागृती व्हावी, यासाठी राज्यात प्रथमच ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ हा नऊ दिवसांचा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमातून राज्यातील विद्यापीठे आणि वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापक व वैद्यकीय तज्ज्ञ राज्यभरातील विद्यार्थ्यांशी थेट आरोग्यविषयक संवाद साधणार आहेत.

विद्यार्थ्यांशी थेट संवाद –

राज्यातील वैद्यकीय, कृषी, अभियांत्रिकी, विज्ञान, वाणिज्य, कला आणि इतर विद्याशाखांतील विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होतील. प्रत्येक जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापक, विभागप्रमुख आणि वैद्यकीय तज्ज्ञ विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.

तरुण वयात आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्यास त्याचे परिणाम पुढील आयुष्यात जाणवू शकतात. त्यामुळे आजार झाल्यानंतर उपचार घेण्याबरोबरच आजार टाळण्यासाठी योग्य आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, मानसिक आरोग्याची काळजी, व्यसनांपासून दूर राहणे आणि वेळेवर आरोग्य तपासणी यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले जाणार आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आरोग्याबाबत जागृत राहण्याबरोबरच ही माहिती कुटुंब, मित्र आणि समाजापर्यंत पोहोचवावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.

‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ हा उपक्रम राज्यातील तरुणाईशी थेट संवाद साधणारा पहिलाच उपक्रम आहे. सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत तरुणांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांवर त्यांच्याशी थेट संवाद साधणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांना या संवादातून आरोग्याशी संबंधित प्रश्न मोकळेपणाने मांडता येणार आहेत. तज्ज्ञांकडून मिळणारी माहिती आरोग्यदायी जीवनशैली करिता विद्यार्थ्यांना उपयोगी ठरणार आहे.

  • रामेश्वर नाईक (कक्ष प्रमुख, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष)

संवादाचे विषय –

–  बदलती जीवनशैली आणि तरुणांचे आरोग्य

–  संतुलित आहार आणि बदललेल्या आहाराच्या सवयी

–  व्यायाम आणि शारीरिक तंदुरुस्ती

–  मानसिक आरोग्य

–  मोबाईल, सोशल मीडिया आणि वाढता स्क्रीन टाइम

–  व्यसनांपासून दूर राहणे

–  निरोगी जीवनशैली आणि आरोग्यदायी समाजनिर्मिती

हेही वाचा:  माजी अग्निवीरांना महाराष्ट्र शासनाचा मोठा दिलासा; सरकारी सेवेतील ‘गट-क’ गणवेशधारी पदांवर १०% आरक्षण आणि लेखी-शारीरिक परीक्षेतून पूर्ण सूट

बातमी शेअर करा !
Share
Tags: cmrfmarathi newsmukhyamantri arogya samvadnavratri festival 2026suvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्यातील पिंपळगाव बुद्रुक येथे सेवा संकल्प अभियानातून 222 लाभार्थ्यांना विविध शासकीय सेवांचा लाभ

पाचोऱ्यातील पिंपळगाव बुद्रुक येथे सेवा संकल्प अभियानातून 222 लाभार्थ्यांना विविध शासकीय सेवांचा लाभ

October 1, 2026
चार भंगार व्यावसायिकांविरुद्ध गुन्हे दाखल; 75 हजारांचा कॉपर-ॲल्युमिनियम तारसाठा जप्त, पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची कारवाई

चार भंगार व्यावसायिकांविरुद्ध गुन्हे दाखल; 75 हजारांचा कॉपर-ॲल्युमिनियम तारसाठा जप्त, पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची कारवाई

October 1, 2026
नवरात्रीत होणार ‘जागर आरोग्याचा’! ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ उपक्रमातून साधणार आरोग्य विषयी तरुणांशी संवाद

नवरात्रीत होणार ‘जागर आरोग्याचा’! ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ उपक्रमातून साधणार आरोग्य विषयी तरुणांशी संवाद

October 1, 2026
माजी अग्निवीरांना महाराष्ट्र शासनाचा मोठा दिलासा; सरकारी सेवेतील ‘गट-क’ गणवेशधारी पदांवर १०% आरक्षण आणि लेखी-शारीरिक परीक्षेतून पूर्ण सूट

माजी अग्निवीरांना महाराष्ट्र शासनाचा मोठा दिलासा; सरकारी सेवेतील ‘गट-क’ गणवेशधारी पदांवर १०% आरक्षण आणि लेखी-शारीरिक परीक्षेतून पूर्ण सूट

September 30, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांना मोठा दिलासा! ‘UDID’ कार्ड काढण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ; राज्य शासनाचा निर्णय

दिव्यांग लाभार्थ्यांना मोठा दिलासा! ‘UDID’ कार्ड काढण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ; राज्य शासनाचा निर्णय

September 30, 2026
कौशल्य आणि ज्ञानाचा समतोल राखणे आवश्यक; जळगावातील रोजगार मेळाव्यात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे मत

कौशल्य आणि ज्ञानाचा समतोल राखणे आवश्यक; जळगावातील रोजगार मेळाव्यात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे मत

September 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page