• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीतील उपाययोजनांबाबत आढावा बैठक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रशासनाला महत्वाच्या सूचना

जळगाव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीत प्रशासनाने अतीतत्पर राहून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडून त्यांना मदत करावी - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 4, 2026
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
जळगाव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीतील उपाययोजनांबाबत आढावा बैठक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रशासनाला महत्वाच्या सूचना

जळगाव, 4 ऑक्टोबर: दुष्काळी परिस्थितीत प्रशासनाने अतीतत्पर राहून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडून त्यांना मदत करावी असे निर्देश देत, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, शासकीय कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या प्रत्येक नागरिक आणि शेतकरी यांच्या अडचणी समजून घेऊन त्या अडचणी तत्परतेने सोडवाव्यात नागरिकांची व शेतकऱ्यांची अनावश्यक अडवणूक करू नये असे निर्देश संबंधितांना दिलेत.

दुष्काळी परिस्थितीतील उपाययोजनांचा आढावा –

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीतील उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात आज आयोजित बैठकीत महसूल मंत्री श्री बावनकुळे बोलत होते. यावेळी केंद्रीय क्रिडा राज्यमंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार नंदकिशोर महाजन, आमदार अनिल पाटील, आमदार मंगेश चव्हाण, आमदार किशोर पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार अमोल जावळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

मंत्री चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले? –

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, शेतकऱ्यांना पीककर्ज वितरण तसेच कृषीपंपांना वीजजोडणी देताना, बँका आणि महावितरणे कोणतीही टाळाटाळ करू नये. शेतकऱ्यांच्या अर्जांकडे दुर्लक्ष करणाऱ्यावर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. वारंवार कागदपत्रांची मागणी करून नागरिकांना वेठीस धरण्याच्या प्रकारांना आळा घालण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

शेतकऱ्यांच्या घरी जाऊन ई-केवायसी करा –

शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रलंबित आहे, त्यांच्या घरी जाऊन तलाठी, ग्रामसेवक आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी. यासाठी गावपातळीवर विशेष मोहीम राबवून एकही पात्र शेतकरी शासकीय लाभापासून वंचित राहणार नाही, याची प्रशासनाने दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासह वीज केबल चोरीच्या प्रकारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस आणि महावितरणने समन्वयाने कारवाई करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना महत्वाचे आदेश –

शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपापल्या मुख्यालयी उपस्थित राहणे अनिवार्य आहे. मुख्यालयी अनुपस्थित नसल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. नागरिकांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण झाली नाहीत, तर संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची थेट जबाबदारी निश्चित केली जाईल, असेही महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केले.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अधिक संवेदनशीलतेने आणि गतिमान पद्धतीने काम करावे. शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविण्यास सर्वोच्च प्राधान्य देऊन प्रशासनाने तत्पर सेवा देण्याचे निर्देश चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

बैठकीत वीजतार चोरी संदर्भात समस्येचा मुद्दा उपस्थित –

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती खडसे यांनी, जिल्ह्यात होणाऱ्या वीजतार चोरी संदर्भात समस्या मांडली. पालकमंत्री श्री पाटील यांनी यावेळी जिल्ह्यात, विविध योजनेतंर्गत  सुरू असलेल्या कामांच्या प्रगती संदर्भात माहिती सांगून ते म्हणाले जिल्ह्यात सध्या स्थितीला योग्य समन्वयाने काम सुरू आहे असे त्यांनी सांगितले. तसेच विज चोरी संदर्भात पोलिसांमार्फत झालेल्या कारवाईची माहिती दिली.

यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, म्हणाले की, जिल्ह्यात दुष्काळ परिस्थितीत पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे तसेच शेतकऱ्यांना नियमित वीजपुरवठा होईल या दृष्टीने महावितरण विभागाने दक्षता घ्यावी, चारा उपलब्ध होईल अशा प्रकारची पिके शेतकऱ्यांनी आपल्या शेतात घ्यावीत. वनविभागाने सुद्धा या संदर्भात नियोजन करावे असे त्यांनी सांगितले.

बैठकीत आमदार नंदकिशोर महाजन, आमदार किशोर पाटील, आमदार अनिल पाटील यांनी आपल्या मतदार संघातील आवश्यक उपयोजना संदर्भात सूचना मांडल्या. बैठकीच्या सुरुवातीला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची व नागरिकांची विविध समस्यांची  निवेदने स्वीकारली.

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी प्रास्ताविकात पर्जन्यमान, पीक स्थिती, जलसाठा, पाणीटंचाई, चाऱ्याची उपलब्धता बाबत सद्यस्थितीची माहिती दिली तसेच विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचे सादरीकरण केले. बैठकीला, महसूल, कृषी, पशुसंवर्धन, महावितरण, पोलीस, आरोग्य यांच्यासह अन्य विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा: पाचोरा-भडगावच्या विविध प्रश्नांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी आढावा बैठक

बातमी शेअर करा !
Share
Tags: drought situationjalgaon newsmarathi newsrevenue minister chandrashekhar bawankulereview meetingsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीतील उपाययोजनांबाबत आढावा बैठक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रशासनाला महत्वाच्या सूचना

जळगाव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीतील उपाययोजनांबाबत आढावा बैठक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रशासनाला महत्वाच्या सूचना

October 4, 2026
मराठी ही केवळ संवादाची भाषा नव्हे, तर संस्कृती-इतिहासाची साक्षीदार; डिजिटल युगात मराठीला ज्ञानभाषा करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठी ही केवळ संवादाची भाषा नव्हे, तर संस्कृती-इतिहासाची साक्षीदार; डिजिटल युगात मराठीला ज्ञानभाषा करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 4, 2026
जळगावात स्व. हरिभाऊ जावळे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन व अभिवादन

जळगावात स्व. हरिभाऊ जावळे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन व अभिवादन

October 3, 2026
पाचोरा-भडगावच्या विविध प्रश्नांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी आढावा बैठक

पाचोरा-भडगावच्या विविध प्रश्नांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी आढावा बैठक

October 3, 2026
SIRची पडताळणी सुरू; Unmapped व विसंगती असलेल्या मतदारांच्या घरी BLO-AERO पथक जाणार, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नागरिकांना केले महत्वाचे आवाहन

SIRची पडताळणी सुरू; Unmapped व विसंगती असलेल्या मतदारांच्या घरी BLO-AERO पथक जाणार, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नागरिकांना केले महत्वाचे आवाहन

October 3, 2026
दिवेआगर दुर्घटना प्रकरण; आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रशासनाला महत्वाच्या सूचना

दिवेआगर दुर्घटना प्रकरण; आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रशासनाला महत्वाच्या सूचना

October 2, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page