• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर अनंतात विलीन; पुण्यातील डोणजे गावात शासकीय इतमामात पार पडले अंत्यसंस्कार

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 9, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर अनंतात विलीन; पुण्यातील डोणजे गावात शासकीय इतमामात पार पडले अंत्यसंस्कार

पुणे, 9 ऑक्टोबर: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयाची अमिट छाप सोडणारे ज्येष्ठ अभिनेते विश्वनाथ (नाना) पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यातील खडकवासला जवळील डोणजे गावातील त्यांच्या ‘नानाची वाडी’ या फार्महाउसवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. काल ८ ऑक्टोबर २०२६ रोजी वयाच्या ७५ व्या वर्षी झालेल्या त्यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण सिनेसृष्टी आणि महाराष्ट्रात मोठी शोककळा पसरली आहे

नाना पाटेकर यांची वयाच्या ७५व्या वर्षी गोव्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच चाहते, चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शोक व्यक्त केला. गोव्यातील आवश्यक वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नाना पाटेकर यांचे पार्थिव पुण्याच्या दिशेने रवाना करण्यात आले. यावेळी त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी पत्नी निलकांती पाटेकर आणि मुलगा मल्हार पाटेकर उपस्थित होते. आपल्या प्रिय व्यक्तीला अखेरचा निरोप देताना कुटुंबीय भावूक झाल्याचे हृदयस्पर्शी दृश्य पाहायला मिळाले.

स्वतः गोळा केलेल्या लाकडांवर अखेरचा निरोप –
नाना पाटेकर अत्यंत संवेदनशील आणि साधे आयुष्य जगणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी जिवंतपणीच स्वतःच्या अंत्यसंस्कारासाठी १२ मण सुकी लाकडे गोळा करून ठेवली होती आणि ‘माझ्यावर याच लाकडांवर अंत्यसंस्कार करावेत’ अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यांची ही अंतिम इच्छा कुटुंबीयांनी पूर्ण केली. उन्हाळ्यात त्यांनी स्वतःच्या शेतातून गोळा केलेल्या याच लाकडांवर त्यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आला. यावेळी पोलिस दलाच्यावतीने शासकीय इतमामात मानवंदना देण्यात आली.

‘….म्हणून कालच करण्यात आले अंत्यसंस्कार!’ –

नाना पाटेकर यांचे गोव्यातील डोना पाउला येथील निवासस्थानी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले होते. त्यानंतर त्यांचे पार्थिव विशेष विमानाने पुण्यात आणण्यात आले. नानांचे सुपुत्र मल्हार पाटेकर आणि पत्नी नीलकांती पाटेकर यांनी त्यांना मुखाग्नी दिला. सकाळी दुर्घटना झाल्यामुळे प्रवासात खूप वेळ गेला होता, म्हणूनच पुढील दिवसाची वाट न पाहता त्याच रात्री नानांना अंतिम निरोप देण्याचा निर्णय घेण्यात आला, असे मल्हार पाटेकर यांनी स्पष्ट केले

पुण्यात नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचे मुख्यमंत्र्यांनी घेतलं अंत्यदर्शन –

ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर आज डोणजे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत दादा पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन पुष्पचक्र अर्पण करत श्रद्धांजली वाहिली.

चाहते आणि दिग्गजांची उपस्थिती –
महाराष्ट्र शासनाने नाना पाटेकर यांच्या कला आणि सामाजिक क्षेत्रातील (नाम फाउंडेशन) अतुलनीय योगदानाचा सन्मान करत त्यांना ३-गन सॅल्यूट देऊन शासकीय इतमामात निरोप दिला. यावेळी बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ, चित्रपट दिग्दर्शक अनिल शर्मा, अनीस बझ्मी, नाम फाउंडेशनचे पदाधिकारी, राजकीय नेते आणि हजारो ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थित असलेल्या शेकडो चाहत्यांनी ‘नाना साहेब अमर रहें’ अशा घोषणा देत आपल्या लाडक्या ‘नटसम्राट’ला अश्रूपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप दिला.

हेही वाचा: महाराष्ट्राच्या दुष्काळी परिस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांकडून अमित शाह यांना माहिती; केंद्र सरकारकडून विशेष मदतीची मागणी

बातमी शेअर करा !
Share
Tags: marathi newsnana patekarnana patekar cremationnana patekar passes awaysuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यात चारा साक्षरता व संवर्धन अभियानाचा पहूर येथून शुभारंभ

जळगाव जिल्ह्यात चारा साक्षरता व संवर्धन अभियानाचा पहूर येथून शुभारंभ

October 9, 2026
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर अनंतात विलीन; पुण्यातील डोणजे गावात शासकीय इतमामात पार पडले अंत्यसंस्कार

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर अनंतात विलीन; पुण्यातील डोणजे गावात शासकीय इतमामात पार पडले अंत्यसंस्कार

October 9, 2026
मोठी बातमी! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मोठी बातमी! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

October 8, 2026
महाराष्ट्राच्या दुष्काळी परिस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांकडून अमित शाह यांना माहिती; केंद्र सरकारकडून विशेष मदतीची मागणी

महाराष्ट्राच्या दुष्काळी परिस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांकडून अमित शाह यांना माहिती; केंद्र सरकारकडून विशेष मदतीची मागणी

October 7, 2026
Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषद येथे शिक्षक समायोजन व पदस्थापना प्रक्रिया यशस्वी

Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषद येथे शिक्षक समायोजन व पदस्थापना प्रक्रिया यशस्वी

October 7, 2026
Jalgaon News: सेवा संकल्प अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन

Jalgaon News: सेवा संकल्प अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन

October 7, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page