• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home

‘अबकी बार भाजपा तडीपार, हा एकच नारा घेऊन जनतेत जा’, मुंबईत उद्धव ठाकरे कडाडले

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 17, 2024
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या, देश-विदेश
‘अबकी बार भाजपा तडीपार, हा एकच नारा घेऊन जनतेत जा’, मुंबईत उद्धव ठाकरे कडाडले

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी

मुंबई, 17 मार्च : शिवतीर्थावर जेव्हा रणशिंग फूकलं जातं, मुंबईतून जेव्हा एखादी गोष्ट बोलली जाते, तेव्हा संपूर्ण देश त्या मार्गावरुन चालतो. देशातील जनता ही आमच्यासोबत आहे. एकच नारा पुन्हा घेऊन अबकी बार भाजपा तडीपार हा संदेश घेऊन गावागावात जा आणि या हुकूमशाही राजवटीचा अंत करा, असे आवाहन करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.

काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेचा 63 दिवसांनंतर आज महाराष्ट्रातील मुंबईत समारोप झाला. यानिमित्ताने मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यमक्रमाला इंडिया आघाडीचे अनेक दिग्गज नेते उपस्थित आहेत.

मंचावर दिग्गज नेते उपस्थित –

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मुंबईतील मणिभवन ते ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत न्याय संकल्प पदयात्रा काढली. या पदयात्रेत त्यांच्यासोबत त्यांची बहीण प्रियांका गांधी वड्रा आणि अभिनेत्री स्वरा भास्कर देखील उपस्थित आहेत. यावेळी मंचावर डाव्या बाजूला राहुल गांधी, एम. के. स्टॅलिन, फारुख अब्दुल्ला, प्रकाश आंबेडकर, तेजस्वी यादव, के सी वेणुगोपाल, प्रियांका वाड्रा, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, संजय राऊत, जयंत पाटील, विजय वड्डेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, तुषार गांधी तर उजवीकडे मल्लिकाजूर्न खर्गे, शरद पवार, सोरेन, मेहबुबा मुफ्ती, रेवंथ रेड्डी, वर्षा गायकवाड, सौरभ भारद्वाज, सुखविंदर सखू, अशोक गेहलोत, सुशिलकुमार शिंदे, आदित्य ठाकरे आदी. नेते उपस्थित आहेत.

काय म्हणाले उद्धव ठाकरे –

यावेळी कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, देश वाचला तर आम्ही वाचू. व्यक्तीची ओळख ही देश असली पाहिजे. कुणापेक्षाही देश मोठा आहे. आज पर्यंत आपण अनेक अनुभव घेतले. देशासाठी एक मजबूत सरकार पाहिजे, असं वाटलं होतं. अटलजींच्या वेळी देशात चांगलं वातावरण होते. मात्र, 2014 पासून देशात एकाचं सरकार आहे. कुणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन येत नाही. आजच वेळ आली आहे. हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. आपला इतिहास हा तोडा फोडा आणि राज्य करा असा असेल तर आपल्यामध्ये जो फूट पाडत असेल, त्याला तोडा फोडा आणि त्याच्या छातडावर राज्य करा, हे दाखवायची वेळ आली आहे.
मला खात्री आहे, शिवतीर्थावर जेव्हा रणशिंग फूकलं जातं, मुंबईतून जेव्हा एखादी गोष्ट बोलली जाते, तेव्हा संपूर्ण देश त्या मार्गावरुन चालतो. देशातील जनता ही आमच्यासोबत आहे. एकच नारा पुन्हा घेऊन अबकी बार भाजपा तडीपार हा संदेश घेऊन गावागावात जा आणि या हुकूमशाही राजवटीचा अंत करा, एवढीच एक विनंती करतो, असेही आवाहनही त्यांनी यावेळी नागरिकांना केले.

न्याय यात्रेचा समारोप –

काँग्रेस पक्षाच्या या न्याय यात्रेच्या समारोपासाठी शिवाजी पार्क येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्याशिवाय तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, आरजेडी नेते तेजस्वी यादव आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचा यात समावेश आहे. शिवसेना (UBT), NCP (शरद पवार गट), आम आदमी पार्टी (AAP) यांच्यासह I.N.D.I.A. आघाडीमधील इतर पक्षांचे नेतेही उपस्थित आहेत. ही सभा विरोधकांच्या ताकदीचे प्रदर्शन असल्याचेही मानले जात आहे.

हेही वाचा : ईव्हीएमशिवाय नरेंद्र मोदी निवडणूक जिंकु शकत नाही, भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपात राहुल गांधींचा हल्लाबोल

बातमी शेअर करा !
Share
Tags: bharat jodo nyay yatrabjpmumbaiuddhav thackeray

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

VIDEO | मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना; पाचोरा-भडगाव मतदारसंघातील पहाण येथे जळगाव जिल्ह्यातील पहिल्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

VIDEO | मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना; पाचोरा-भडगाव मतदारसंघातील पहाण येथे जळगाव जिल्ह्यातील पहिल्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

May 3, 2026
माउंट आबू राष्ट्रीय मीडिया संमेलनाचा शुभारंभ: ‘वैश्विक शांततेची गरज – मीडियाची भूमिका’ या विषयावर चर्चा

माउंट आबू राष्ट्रीय मीडिया संमेलनाचा शुभारंभ: ‘वैश्विक शांततेची गरज – मीडियाची भूमिका’ या विषयावर चर्चा

May 3, 2026
किस्से लोकभवनाचे – लेख क्र. 22 | संस्थात्मक आठवणी : सचिन तेंडुलकर आणि लोकभवन

किस्से लोकभवनाचे – लेख क्र. 22 | संस्थात्मक आठवणी : सचिन तेंडुलकर आणि लोकभवन

May 2, 2026
पाचोऱ्याच्या कमलेश सोनवणेला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते यंदाचा जिल्हा युवा पुरस्कार प्रदान

पाचोऱ्याच्या कमलेश सोनवणेला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते यंदाचा जिल्हा युवा पुरस्कार प्रदान

May 2, 2026
स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांनी सक्षम पिढी घडवण्यास मदत करावी – आमदार किशोर आप्पा पाटील

स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांनी सक्षम पिढी घडवण्यास मदत करावी – आमदार किशोर आप्पा पाटील

May 2, 2026
मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रम

मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रम

May 2, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page