सुनिल माळी, प्रतिनिधी
पारोळा, 13 जुलै : महाराष्ट्र शासनाच्या नगर परिषदेच्या माझी वसुंधरा 5.0 अंतर्गत श्री स्वामी समर्थ माध़्यमिक विद्यालयाच्या इयत्ता पाचवी ते दहावी वर्गातील तसेच शिक्षक-शिक्षकेत़्तर कर्मचारी यांच्या समावेशाने पारोळा शहरातून वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले. एक मिनिटांत एक हजार वृक्ष लागवड अभिनव उपक्रमा अंतर्गत वंजारी शिवारात चारशे पऩ्नास वृक्षांची झाडे लावून विद्यार्थ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.
450 झाडांची लागवड –
श्री स्वामी समर्थ माध़्यमिक विदयालयाच्या व नगर परीषद यांच्या संयुक़्त विद्यमाने आज रोजी विदयालयातून ढोल ताशाच्या गजरात शहरातील सानेगुरुजी कॉलनी, मिश्किल बाबा दर्गा, गोधळीवाडा, मडक्या मारुती चौक, आझाद चौकातून सरळ वंजारी शिवारात विदयालयातील सर्व विदयार्थ्याच्या सहकार्याने वृक्ष दिंडी काढून माझी वसुंधरा 5.0 अंतर्गत चारशे पन्नास रोपाची झाडे लावून प्रतिसाद दिला.
वृक्ष संवर्धनाची घेतली प्रतिज्ञा –
वृक्ष दिंडीच्या कार्यक्रमात विदयालयाचे मुख्याध्यापक गोविंद टोळकर, नगर परिषदचे शहर समन्वयक अक्षय सोनवणे, सहाय्यक प्रकल़्प अधिकारी चंद्रकांत महाजन, किशोरभाऊ चौधरी, नगर परीषदचे इतर कर्मचारी तसेच पर्यावरण दूत तसेच सिडबॉलचे संयोजक राहूल निकम, प्रा.डॉ.संजय भावसार, डॉ.प्रा. प्रदिप ॵजेकर, विदयालयाचे शिक्षक आर. एम. पाटील, सुनील आफ्रे, प्रकाश महाजन, विजय चांदवडे, भारती पाटील, किरण पाटील, मनोहर पाटील, मनीषा टोळकर, शिक्षकेत़्तर कर्मचारी अमृतराव पाटील, निलेश डहाळे- जैन, विलास भामेरे तसेच विद्यालयाचे सर्व विदयार्थ्यांनी वृक्ष लागवड मोठया उत्साहात केली. कार्यक्रमात वृक्ष संवर्धनाची प्रतिज्ञा घेण्यात आली.
हेही वाचा : Pooja Khedekar: पूजा खेडकर प्रकरणात विद्यार्थ्यांवर अन्याय, कारवाई करावीच लागेल – विजय कुंभार