सुनिल माळी, प्रतिनिधी
पारोळा, 10 ऑगस्ट : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी एरंडोल विधानसभेची महत्वपुर्ण बैठक पारोळा येथे आमदार चिमणराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. यावेळी एरंडोल व पारोळा तालुक्यातील जास्तीत जास्त पात्र महिलांची नोंदणी कशी करता येईल, यासाठी आढावा व उपाय योजना करण्यासाठी चर्चा करण्यात आली.
आमदार चिमणराव पाटील यांनी दिल्या सूचना –
नोंदणीसाठी महिलांपर्यंत शासनाचे प्रतिनिधी कसे पोहचतील व पात्र महिला वंचित राहणार यासाठी काय उपाययोजना करता येईल याबाबत आमदार चिमणराव पाटील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सुचना दिल्या. तसेच पात्र महिलांना अर्ज भरण्याच्या वेळी उद्भवत असणाऱ्या अडचणी जाणून त्या शासन दरबारी कळविण्याचा सुचना देखील यावेळी देण्यात आल्या. दरम्यान, पारोळा तालुक्यातील 24,000 तर एरंडोल तालुक्यातील 20,000 पात्र महिलांचे प्राप्त अर्ज मंजुर करण्यात आले आहेत.
यांची होती उपस्थिती –
याप्रसंगी समितीचे अध्यक्ष कुणाल महाजन, सदस्य पंजाबराव पवार, शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष विजय पाटील, तहसीलदार डॉ. उल्हास देवरे, मुख्याधिकारी किशोर चव्हाण, पारोळा गटविकास अधिकारी किशोर शिंदे, एरंडोल गटविकास अधिकारी दादाजी जाधव, महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी संजय धनगर यांचेसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
हेही वाचा : खान्देशातील नार-पार गिरणा प्रकल्पासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली महत्वाची माहिती