• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

राज्यातील सर्व शाळांमध्ये होणार माजी विद्यार्थी संघाची स्थापना; “जळगाव पॅटर्न”चा राज्यभर अंमल

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 4, 2025
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
Alumni Association to be established in all schools in the state – “Jalgaon Pattern” to be implemented across the state

राज्यातील सर्व शाळांमध्ये होणार माजी विद्यार्थी संघाची स्थापना; “जळगाव पॅटर्न”चा राज्यभर अंमल

जळगाव, 4 ऑक्टोबर : शालेय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका, अनुदानित व खासगी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रगतीत सक्रिय सहभाग घेता यावा, शाळेशी भावनिक नाते घट्ट व्हावे आणि सामाजिक बांधिलकी जपली जावी या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची पायाभरणी मात्र जळगाव जिल्हा परिषदेच्या नाविन्यपूर्ण प्रयोगातून झाली आहे.

जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी पदभार स्वीकारल्यानंतर 4 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित एका कार्यक्रमात जिल्ह्यातील शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ राबविण्याची संकल्पना जाहीर केली होती. सध्या जळगाव जिल्ह्यात 20 पेक्षा अधिक माजी विद्यार्थी संघ यशस्वीपणे कार्यरत असून, त्यांच्या उपक्रमामुळे शाळांच्या विकासात सकारात्मक बदल दिसून येत आहेत. हाच “जळगाव पॅटर्न” आता संपूर्ण राज्यात अंमलात येणार आहे.

शालेय शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार –

  • माजी विद्यार्थी संघामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष, मुख्याध्यापक/प्राचार्य सचिव म्हणून असतील.
  • एक पालक प्रतिनिधी, निवृत्त अधिकारी व शिक्षक सल्लागार सदस्य म्हणून सहभागी होतील.
  • प्रत्येक शाळेला वर्षातून किमान एकदा माजी विद्यार्थी मेळावा व स्नेहसंमेलन घेणे बंधनकारक असेल.
  • गणेशोत्सव, दसरा, दिवाळी, ईद, ख्रिसमस यांसारख्या सणांच्या पार्श्वभूमीवर हे कार्यक्रम आयोजित केले जातील.

या कार्यक्रमांमध्ये माजी विद्यार्थ्यांचा सत्कार, शाळेचा विकास आराखडा, शिक्षक सन्मान व विविध सांस्कृतिक उपक्रम राबविले जातील. तसेच –

  • शाळेच्या भौतिक सुविधांच्या उभारणीत माजी विद्यार्थी मार्गदर्शन व सहकार्य करतील.
  • विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन, शिष्यवृत्ती व प्रेरणा दिली जाईल.
  • पर्यावरणपूरक आणि सामाजिक उपक्रमांना चालना दिली जाईल.

राज्य सरकारने यासाठी विशेष ऑनलाइन नोंदणी प्रणाली तयार केली असून, त्यावर प्रत्येक माजी विद्यार्थ्यांची नोंदणी होणार आहे. शाळांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांचे फोटो व अहवाल या पोर्टलवर अपलोड करणे अनिवार्य असेल. जळगाव जिल्ह्याचा नाविन्यपूर्ण प्रयोग आता राज्यभर झळकणार असल्याने, जळगाव पॅटर्नने शिक्षण क्षेत्रात आदर्श निर्माण केला आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon newsjalgaon zilla parishadjalgaon zpmarathi schoolsminal karalwalzilla parishad jalgaonzilla parishad schools

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आजच्या निकालात तीन राज्यांत भाजपची सत्ता; तमिळनाडूत विजय थलपती ठरला किंगमेकर; 5 राज्यांचे निकाल निकालाची A to Z अपडेट

आजच्या निकालात तीन राज्यांत भाजपची सत्ता; तमिळनाडूत विजय थलपती ठरला किंगमेकर; 5 राज्यांचे निकाल निकालाची A to Z अपडेट

May 4, 2026
Election Results 2026: देशातील 5 राज्यांसह बारामती, राहुरी पोटनिवडणुकीचा आज निकाल, मतमोजणीला सुरूवात

Election Results 2026: देशातील 5 राज्यांसह बारामती, राहुरी पोटनिवडणुकीचा आज निकाल, मतमोजणीला सुरूवात

May 4, 2026
नसरापूर प्रकरणी आरोपीस फाशीच्या शिक्षेसाठी प्रयत्न; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

नसरापूर प्रकरणी आरोपीस फाशीच्या शिक्षेसाठी प्रयत्न; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

May 4, 2026
VIDEO | मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना; पाचोरा-भडगाव मतदारसंघातील पहाण येथे जळगाव जिल्ह्यातील पहिल्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

VIDEO | मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना; पाचोरा-भडगाव मतदारसंघातील पहाण येथे जळगाव जिल्ह्यातील पहिल्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

May 3, 2026
माउंट आबू राष्ट्रीय मीडिया संमेलनाचा शुभारंभ: ‘वैश्विक शांततेची गरज – मीडियाची भूमिका’ या विषयावर चर्चा

माउंट आबू राष्ट्रीय मीडिया संमेलनाचा शुभारंभ: ‘वैश्विक शांततेची गरज – मीडियाची भूमिका’ या विषयावर चर्चा

May 3, 2026
किस्से लोकभवनाचे – लेख क्र. 22 | संस्थात्मक आठवणी : सचिन तेंडुलकर आणि लोकभवन

किस्से लोकभवनाचे – लेख क्र. 22 | संस्थात्मक आठवणी : सचिन तेंडुलकर आणि लोकभवन

May 2, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page