• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

मंत्री उदय सामंत यांनी दिलं सरकारचं पत्र अन् बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन मागे; मात्र, सरकारला दिला ‘हा’ अल्टिमेटम; आंदोलनाची A टू Z स्टोरी

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 14, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
मंत्री उदय सामंत यांनी दिलं सरकारचं पत्र अन् बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन मागे; मात्र, सरकारला दिला ‘हा’ अल्टिमेटम; आंदोलनाची A टू Z स्टोरी

अमरावती, 14 जून : अमरावतीतील गुरूकुंज मोझरी येथे प्रहारचे सर्वेसर्वा तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचे शेतकरी कर्जमाफी तसेच दिव्यांगाच्या विविध मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू होते. गेल्या सात दिवसांपासून हे आंदोलन सुरू असताना आता मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज बच्चू कडूंच्या आंदोलनस्थळी भेट देत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकारची भूमिका स्पष्ठ केली. यानंतर बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन मागे घेतले.

बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन –

अमरावती येथील गुरुकुंज मोझरी येथे शेतकरी कर्जमाफी, दिव्यांग बांधव, विधवा महिला, मासेमारी करणाऱ्यांच्या समस्यांसाठी प्रहारचे बच्चू कडू यांनी 8 जून रोजी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. आतापर्यंत या आंदोलनाला शेतकरी नेते राकेश टिकेत, मराठा आंदोलक मनोज जरांगे, आमदार रोहित पवार अशा अनेक नेत्यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहत कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. दरम्यान, गेल्या सात दिवसांपासून बच्चू कडूंनी अन्नत्याग आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला होता. काँग्रेसने देखील या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला होता.

बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन मागे –

गेल्या सात दिवसांपासून बच्चू कडूंनी अन्नत्याग आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला होता. अशातच आज राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गुरूकुंज मोझरीत आंदोलनस्थळी भेट दिली. मंत्री उदय सामंतांनी सरकारचे पत्र दिल्यानंतर बच्चू कडू यांनी आंदोलन मागे घेत असल्याचे सांगितले.  मंत्री उदय सामंत आणि एका विधवा महिलेच्या हातून पाणी पित बच्चू कडू यांनी हे आंदोलन मागे घेतले.

मंत्री उदय सामंतांनी दिले सरकारचे पत्र –

आंदोलनस्थळी मंत्री उदय सामंत म्हणाले की, बच्चू कडू यांच्या आंदोलनासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करून आज याठिकाणी भेटायला आलोय. तत्पुर्वी, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबतही चर्चा झाली असून बच्चू कडू यांनी शासनाकडे केलेल्या मागणींवरून शासनाचे अधिकृत पत्र मी याठिकाणी घेऊन आलोय.


मंत्री उदय सामंत पुढे म्हणाले की, कर्जमाफीसंदर्भात येत्या 15 दिवसांच्या आता उच्चस्तरिय समिती नेमली जाईल, त्याचा अहवाल आला की कर्जमाफी होईल. बच्चू कडू यांनी केलेल्या मागण्या कशा मान्य केल्या जातील याचे पत्र घेऊन मी आलोय.

दरम्यान, बच्चू कडू यांचे आंदोलन शेतकरी, दिव्यांग तसेच विधवा महिलांच्या न्याय हक्कासाठी सुरू असून त्या आंदोलनाला न्याय देणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे मंत्री उदय सामंत म्हणाले. यावेळी मंत्री सामंत यांनी सर्वांसमोर शासनाचे पत्र वाचून दाखवत बच्चू कडूंना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.

बच्चू कडू यांचा राज्य सरकारला अल्टिमेटम –

मंत्री उदय सामंत आणि एका विधवा महिलेच्या हातून पाणी पित बच्चू कडू यांनी आंदोलन मागे घेतले. मात्र, कर्जमाफीची तारीख न दिसल्यास 2 ऑक्टोबरपर्यंत अल्टिमेटम दिलाय. कर्जमाफी न झाल्यास गांधी जयंतीला भगतसिंगगिरी करु तसेच मंत्रालयात घुसू, असा थेट इशारा बच्चू कडू यांनी दिलाय. दरम्यान, सरकारने आमचा विश्वासघात केला तर मंत्र्यांच्या घरासमोर आम्ही आंदोलन करून, असेही कडू म्हणाले.

मंत्री बावनकुळेंनी काल रात्री दिली होती भेट –

राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल अमरावतीत बच्चू कडूंच्या आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी मंत्री बावनकुळे यांनी बच्चू कडू यांच्यासोबत दीर्घकाळ चर्चा केली होती. यानंतर त्यांनी बच्चू कडू यांच्या समोरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडू यांच्याशी संवाद साधत शेतकरी कर्जमाफी संदर्भात समिती नेमली जाईल, या समितीमध्ये बच्चू कडू हे देखील असतील आणि या समितीचा रिपोर्ट आल्यानंतर कर्जमाफीचा निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले होते.

हेही वाचा : पंढपुरात आषाढी वारीसाठी येणाऱ्या 1109 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजार रूपये अनुदान, नेमकी बातमी काय?

बातमी शेअर करा !
Share
Tags: amaravatibacchu kadugurkunj mojharihunger strikeshetkari karjmaphisuvarna khandesh liveuday samant

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 14, 2026
श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

October 14, 2026
गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page