सुनिल माळी, प्रतिनिधी
पारोळा, 11 मे : पारोळा तालुक्याचे आराध्य दैवत व प्रति तिरूपती म्हणून प्रसिद्ध असलेले पारोळा येथील प्रभु बालाजी महाराजांना अक्षय तृतीयेंनिमित्त एक क्विंटल एकावन्न किलो आंब्याची आरास करण्यात आली. याप्रसंगी एका भक्ताने 56 किलो आंब्याचे रसही देवाला अर्पण केले. यावेळी आंब्याच्या रसाने प्रभु बालाजीचें अभिषेक करून ते प्रसाद स्वरूपात भाविकांना वाटप करण्यात आले.
तसेच या आंब्याची आरासचे आज 11 मे रोजी सकाळी 8 वाजेपासून प्रसाद म्हणून वाटप करण्यात येणार असल्याची माहिती बालाजी संस्थानचे अध्यक्ष श्रीकांत शिंपी यांनी सांगितले. तसेच या प्रसादाचे जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन बालाजी संस्थानाच्या वतीने करण्यात आले आहे.
अक्षय तृतीया निमित्ताने यात्रोत्सव –
पारोळा येथे अक्षय तृतीया निमित्ताने श्री. झपाट भवानी संस्थान येथे यात्रोत्सव साजरा होत आहे. सकाळी संस्कार पाठशाळेतील विद्यार्थ्यांनी स्तोत्र पठण करण्यात आले. आंब्याची आरास देवीसमोर करण्यात आली आहे. बारागाडे ओढण्याची खूप जुनी परंपरा आहे, बारागाड्यावर लोक बसलेले असतात व ते बारा गाडे भगत ओढून नेतो त्यांना सहकारी मदत करतात झपाट भवानी चौकातून बारागाडे ओढले गेले. चौकाला पूर्ण यात्रेचे स्वरूप आलेले होते तसेच संस्थाना कडून देवीची विविध भागातून मिरवणूक संध्याकाळी काढण्यात आली यात्रेसाठी डॉ. मंगेश तांबे, मोहीत तांबे, झपाट भवानी मंदिरातील सहकारी स्वयंसेवक यांचे सहकार्य लाभले.
हेही वाचा : पारोळा शहर हद्दीत भरणारा आठवडे बाजार उद्या बंद, नेमकं काय कारण?