चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 28 एप्रिल : महायुतीत भाजपने जेष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. दरम्यान, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या उमेदवारीवर त्यांचे पुतणे तथा भाजपचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष रोहित निकम यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
काय म्हणाले रोहित निकम? –
काका राजकारणात येतील असे कोणालाही वाटत नव्हते. मात्र, त्यांच्या उमेदवारीमुळे आमच्या कुटुंबात नक्कीच आनंद आहे. मी लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, आता माझे काका उज्वल निकम यांना उमेदवारी मिळाल्यामुळे नक्कीच त्याचा मला आनंद वाटत असल्याचे रोहित निकम यांनी माध्यमांसोबत बोलताना सांगितले. ज्या पद्धतीने उज्वल निकम यांनी न्यायालयात आपली कामगिरी गाजवली अगदी त्याच पद्धतीने ते खासदार म्हणून सुद्धा उत्कृष्ट कामगिरी करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
जळगाव लोकसभेसाठी होते इच्छुक –
जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर होण्यापुर्वी रोहित निकम यांचे नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत होते. या पार्श्वभूमीवर गेल्या काळात एकनाथ शिंदे यांनी रोहित निकम यांची भेट घेतल्याची माहिती होती. मात्र, भाजपने जाहीर केलेल्या दुसऱ्या उमेदवार यादीत जळगाव लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचे तिकिट कापत स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. दरम्यान, स्मिता वाघ विरूद्ध ठाकरे गटाचे करण पवार यांच्यात जोरदार लढत रंगणार आहे.
उज्ज्वल निकम यांचे नाव देखील होते चर्चेत –
जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी जेष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचे देखील नाव चर्चेत होते. जळगाव लोकसभा मतदारसंघातून त्यांना भाजप निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार अशा चर्चा होत्या. मात्र, आता त्यांना थेट मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारी मिळाल्यानंतर काल त्यांनी भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश करत
हेही वाचा : उज्ज्वल निकम यांनी राजकारणातील ‘एन्ट्रीवर’ दोन वर्षांपुर्वीच केले होते भाष्य, नेमकं काय म्हणाले होते?