चोपडा, 27 जून : चोपडा तालुक्यातील वस्ती पाड्यावर व प्रत्येक गावात तसेच शहरात विकास पोहचवण्याचे काम आपण करणार असुन पुढील कामे सिंचनाला चालना देऊन मतदारसंघाच्याच्या पाणी पातळीत वाढ करुन तालुका सुजलाम सुफलाम करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन माजी आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी केले. चोपडा येथे आयोजित शिवसेनेच्या आभार बैठकीत ते बोलत होते.
चोपडा विधानसभा शिवसेनेची आभार बैठक संपन्न –
चोपडा विधानसभा क्षेत्राच्या आमदार लता चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत काल चोपडा येथे बोथरा मंगल कार्यालयात शिवसेनेची आभार बैठक संपन्न झाली. लोकसभेच्या निवडणुकीत रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या रक्षा खडसे यांना 62342 एवढा मतदारसंघातून सर्वाधिक लीड दिल्याने या आभार सभेचे आयोजन करण्यात आले.
चोपडा शहरातुन तसेच ग्रामीण भागातुन शिवसेनेच्या युवासैनिकांनी हाऊस टु हाऊस प्रचार करुन महायुतीचा युतीधर्म प्रामाणिकपणे सर्वच स्तरातील शिवसैनिकानी प्रंचड मेहनत घेवुन आपल्या आमदार लता सोनवणे व माजी.आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या आदेशाने संपूर्ण शहर तालुका पिजुंन काढुन घवघवीत यश मिळवुन दिले. या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांचे व युवासैनिकांचे व महीला आघाडीचे विशेष आभार या बैठकीत मानले.
यावेळी शिवसैनिक व पदाधिकारीनी आपल्या मनोगतात येणाऱ्या विधानसभेसाठी जोरदार तयारी करुन जास्तीत जास्त मताधिक्याने आमदार लताताई सोनवणे यांना निवडून आणु अशी ग्वाही दिली. तसेच माजी आ.प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी तालुक्यात 400 कामांचे भुमिपुजन बाकी असुन या कामांचे आचारसंहीता संपल्यानंतर लगेचच भुमीपुजन करण्यात येईल. यावेळी शहर तसेच ग्रामीण व आदीवासी भागातुन आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे माजी.आ.चंद्रकांत सोनवणे यांनी मनापासून आभार मानले.
यांची होती उपस्थिती –
याप्रंसगी शिवसेना जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, कृउबा सभापती नरेद्र पाटील, यावल कृउबा उपसभापती बबलु कोळी, माजी जि. प. सदस्य सुभाष सोळुंके, माजी सभापती पं. स. माणिकबापु महाजन, कृउबा समिती संचालक सुर्यभान पाटील, कृषी उत्पन्न बाजार समीती संचालक रावसाहेब पाटील, अॕड शिवराज पाटील विजय पाटील, किरण देवराज कल्पना भरत पाटील, मंगला पाटील, माजी उपसभापती एम व्ही पाटील, माजी उपनगराध्यक्ष विकास पाटील, माजी नगरसेवक मेहमुद बागवान, राजेंद्र पाटील, प्रताप पावरा, नामादेव पाटील, सागर ओतारी, भरत चौधरी, राजेंद्र पाटील, कैलास बाविस्कर, कुणाल पाटील, अरुण पाटील, ह.भ.प.श्रीराम महाराज, भावना माळी, शितल देवराज प्रताप आण्णा पाटील, इम्रान खाटीक, अशपाक भाई, संजय शिरसाठ, दिनु आण्णा महाजन , सुनील बरडीया, प्रविण जैन, बिपीन जैन, दिपक चौधरी, प्रदीप बारी आदी मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास आजपासून सुरूवात, विरोधक ‘या’ मुद्यांवरून सरकारला घेरणार?