मुंबई – बाबा सिद्दीकीच्या यांच्या हत्येची घटना ही दुर्दैवी असून आरोपींना पकडून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले जाईल आणि लवकरात लवकर याप्रकरणी कारवाई केली जाईल, आरोपींना शिक्षा केली जाईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला आणि या गोळाबाराच्या घटनेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत ही प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे –
माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. दुर्दैवाने त्यांचा त्यात मृत्यू झाला, अशी बातमी आहे आणि ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे, दु:खद घटना आहे. याप्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली आहे, असे पोलीस आयुक्त फणसाळकर यांनी मला सांगितले आहे. तर एक आरोपी फरार आहे. या दोन जणांमध्ये एक हरयाणा आणि एक उत्तरप्रदेशातील आहे. तर तिसऱ्या फरार आरोपीला पकडण्यासाठी पोलीस तपास करत आहेत आणि लवकरात लवकर त्याला अटक केली जाईल आणि तिघांवर कठोर कारवाई करण्यात येईल. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले जाईल आणि लवकरात लवकर याप्रकरणी कारवाई केली जाईल, आरोपींना शिक्षा केली जाईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
कशी घडली घटना –
बाबा सिद्धिकी 9.15 मिनिटांच्या दरम्यान कार्यालयातून बाहेर पडले होते. यादरम्यान, ते कार्यालयाजवळ फटाके वाजवत असताना गोळीबार झाला. फटाके फोडत असताना अचानक 3 जण गाडीतून उतरले. तोंडावर रुमाल बांधून हे तीन जण आले होते. त्यानंतर त्यांनी बाबा सिद्धिकी यांच्यावर 3 राऊंड फायर केले. बाबा सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळील राम मंदिराजवळ हा गोळीबार झाला. त्यांना छातीत एक गोळी लागल्यानंतर ते खाली कोसळले. त्यानंतर लोकांनी त्यांना लीलावती रुग्णालयात तातडीने दाखल केले. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी झाले दाखल असून पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.
हेही वाचा : Big Breaking : अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या, मुंबईत नेमकं काय घडलं?