• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

‘वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर ते धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप’ अन् आता थेट बडतर्फची कारवाई, वाचा A टू Z प्रकरण

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 19, 2025
in महाराष्ट्र, क्राईम, ताज्या बातम्या
‘वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर ते धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप’ अन् आता थेट बडतर्फची कारवाई, वाचा A टू Z प्रकरण

बीड, 19 एप्रिल : बीड जिल्ह्याचे पोलीस दल देखील विविध घडमोडींमुळे चर्चेत आले असताना मोठी बातमी समोर आली आहे. बीड जिल्हा पोलीस दलातील निलंबित असलेला पोलीस अधिकारी रणजीत कासले याने सोशल मीडियावर व्हिडिओ करत गंभीर आरोप केले होते. तसेच त्याच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, त्याला काल बीड पोलिसांनी पुण्यातून अटक केली. तर दुसरीकडे त्याला पोलीस सेवेतूनच बडतर्फ करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

रणजित कासलेने केले होते गंभीर आरोप –
रणजित कासलेला निलंबित करण्यात आल्यानंतर त्याने सोशल मीडियावरून व्हिडिओ व्हायरल करत गंभीर आरोप केले होते. यापैकीच एक आरोप म्हणजे वाल्मिक कराच्या एन्काऊंटरच्या ऑफरचा. वाल्मिक कराच्या एन्काऊंटरसाठी मला ऑफर देण्यात आली होती. यासाठी बंद दाराआड चर्चेला देखील मला बोलवण्यात आले होते. मात्र, मी त्यावेळी नकार दिला असल्याचे रणजित कासलेने सांगितलं होतं. यासोबतच धनंजय मुंडे यांच्या माणसांकडून मला मॅनेज करण्यासाठी निवडणुकीच्या काळात माझ्या बँक खात्यात 10 लाख रूपये देण्यात आल्याचा गौप्यस्फोटही त्याने परवा 17 एप्रिल रोजी पुण्यात केला होता. यासोबत धनंजय मुंडे यांनी इतरही अधिकाऱ्यांना पैसे देण्यात आल्याचा आरोप कासलेने केला होता.

बीड पोलिसांनी केली अटक –
रणजित कासलेवर एका प्रकरणासंदर्भात निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. असे असताना लातूरमध्ये अमित देशमुख हे अकार्यक्षम नेतृत्व असून त्यांच्याविरोधात कुत्र जरी उभं केलं तरी ते निवडून येऊ शकतं, असं वक्तव्य गेल्या एक महिन्यांपुर्वी रणजित कासलेने केले होते. यावरून त्याच्याविरोधात वकिलाच्या तक्रारीवरून अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासाठी बीड पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात होता. मात्र, त्याने पोलिसांना शरण येणार असल्याचेही सांगितले होते. अशातच त्याला काल 18 एप्रिल रोजी पुण्यातून बीड पोलिसांनी अटक केली. दरम्यान, त्याला कालच बीडमध्ये आणत न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आधी निलंबन अन् आता केलं बडतर्फ –
रणजीत कासले हा सायबर पोलिसात कार्यरत असताना विनापरवानगी आरोपीला घेऊन गुजरातमध्ये गेला होता. तेथे त्याने पैसे घेतल्याचा आरोप झाल्याने 26 मार्च रोजी त्याला निलंबित केले होते. यानंतर सोशल मीडियावर व्हिडिओ बनवत पोलीस अधिकारी तसेच राजकीय नेत्यांवर गंभीर स्वरूपाचे आरोप करत होता. निलंबनानंतरही गाडीत टोपी ठेवत इतरांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होता. असे असताना त्याला बीड पोलिसांकडून 19 एप्रिल रोजी पुण्यातून अटक करण्यात आली. मात्र, त्याआधीच गुरूवारी रात्री छत्रपती संभाजीनगरचे विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र यांनी रणजित कासले याला पोलीस खात्यातून बडतर्फ केले. याबाबतची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी दिलीय.

हेही वाचा : Jalgaon Crime : जळगावात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; मसाज पार्लरवर पोलिसांची धाड अन् केली मोठी कारवाई

बातमी शेअर करा !
Share
Tags: beed policedhananjay mundedismissalranjit kaslesuvarna khandesh livewalmik karad

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

July 15, 2026
पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

July 15, 2026
शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

July 15, 2026
VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

July 15, 2026
‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 15, 2026
Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

July 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page